ind vs sa t20 series match timing changed full schedule  sakal
क्रीडा

IND vs SA : वेळ पुन्हा बदलली! टी-20 मालिका 9.30 वाजता नाही तर 'या' वेळेपासून होणार सुरू, BCCI ने स्पष्ट केलं चित्र

Kiran Mahanavar

India vs South Africa T20 Series Match : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 10 डिसेंबरपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ICC T20 वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघासाठी ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे.

दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना डर्बन क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. आता मालिका सुरू होण्यासाठी फक्त 1 दिवस बाकी असून सामन्याच्या वेळेत मोठा बदल दिसून आला आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेच्या सामन्यांच्या वेळेबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम आहे. यापूर्वी हे सामने भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुरू होणार होते. पण बीसीसीआयच्या ताज्या माहितीनुसार या सामन्यांच्या वेळेत बदल झाला आहे.

वेळापत्रकाची वेळ आता बीसीसीआय टीव्हीवर अपडेट करण्यात आली आहे. आता हे तीन टी-20 सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील.

एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांची वेळ

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेनंतर 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. तर दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामनेही होणार आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 पासून हे सामने खेळले जातील.

दक्षिण आफ्रिकेचा टी-20 संघ :

एडन मार्कराम (कर्णधार), ओटानिल बार्टमन, मॅथ्यू ब्रेट्झके, नांद्रे बर्जर, गेराल्ड कोएत्झी (पहिली आणि दुसरी टी२०), डोनोव्होन फरेरा, रीझा हेन्ड्रिक्स, मार्को जॅन्सन (पहिली आणि दुसरी टी-२०), हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, अँडेव्हन फेरेरा. , तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिझाद विल्यम्स, ब्यूरन हेंड्रिक्स.

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ :

यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन, रवींद्र जडेजा (उपकर्णधार). कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

टी-20 मालिकेचे वेळापत्रक -

  • पहिला टी-20 सामना – 10 डिसेंबर 2023, संध्याकाळी 7.30 वाजता

  • दुसरा टी-20 सामना - 12 डिसेंबर 2023, संध्याकाळी 7.30 वाजता

  • तिसरा टी-20 सामना- 14 डिसेंबर 2023, संध्याकाळी 7.30 वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT