India tour of South Africa 2023 Esakal
क्रीडा

Ind vs Sa : रोहित, पांड्या नाही तर 'हा' खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सांभाळणार टीम इंडियाचा पदभार

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संघाचा पदभार

Kiran Mahanavar

India tour of South Africa 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेनंतर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जायचे आहे, जिथे तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. बीसीसीआय गुरुवारी म्हणजेच 30 नोव्हेंबरला या मालिकेसाठी संघाची घोषणा करू शकते.

10 डिसेंबरला डर्बन येथे होणारा पहिला टी-20 सामना असल्याने संघाचे नेतृत्व कोण करणार याकडे निवडकर्त्यांचे लक्ष लागले आहे. रोहित शर्मा खेळणार की नाही, हे अजूनही नक्की नाही, त्यात हार्दिक पांड्या तंदुरुस्त नाही.

टी-20 मध्ये कर्णधार हार्दिक पांड्या दुखापत झाल्यानंतर निवडकर्त्यांकडे सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवणे किंवा रोहित शर्माला पटवणे हाच पर्याय आहे. रोहितने आधीच सांगितले आहे की, मला टी-20 मध्ये खेळायचे नाही. पण नुकत्याच झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये त्याने ज्या प्रकारे कर्णधारपद भूषवले, त्यावरून बीसीसीआयला असे वाटते की त्याने टी-20 फॉरमॅटचे कर्णधारपद वर्ल्ड कपपर्यंत भूषविले पाहिजे.

रोहितची समजूत काढण्यासाठी व्यवस्थापन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा दावाही काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे. जर रोहित सहमत नसेल तर सूर्या दक्षिण आफ्रिकेतील टी-20 मालिकेसाठी कर्णधार असेल, असे मानले जात आहे.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप 2024 च्या वर्ल्ड कपची तयारी सुरू केली आहे. भारताने अनुभवी रोहित, विराट कोहली, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांना टी-20 मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. टीम इंडिया दोन कसोटी सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार असून त्यानंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तितक्याच एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “होय, हार्दिकच्या पुनरागमनानंतर काय होईल हा प्रश्न उरतोच, पण बीसीसीआयला वाटते की रोहितने टी-20 मध्ये नेतृत्व करण्यास सहमती दर्शवली तर तो टी-20 वर्ल्ड कप खेळले. जर रोहित सहमत नसेल तर सूर्या कर्णधार राहील. नवा कर्णधार सूर्यकुमार याच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 पहिल्या तीन सामन्यात दोन जिंकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT