Cricket News File News
क्रीडा

टीम इंडियाला बायो-बबलमधून आठवड्याभराची सुट्टी!

ओमिक्रॉनच्या संकटामुळे टीम इंडियाचे आफ्रिका दौऱ्यावरील वेळापत्रकात बदल करण्यात आलाय.

सुशांत जाधव

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी (India Tour of South Africa 2021-22) भारतीय संघाला बायो-बबलच्या वातावरणातून थोडी विश्रांती मिळाली आहे. घरच्या मैदानात न्यूझीलंड विरुद्धची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉनच्या संकटामुळे टीम इंडियाचे आफ्रिका दौऱ्यावरील वेळापत्रकात बदल करण्यात आलाय.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीचे वेळापत्रकातील या बदलामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघातील खेळाडूंना बायोबबलमधून विश्रांती मिळाली आहे. विराट अॅण्ड कंपनी (Captain Virat Kohli And Team India) 16 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तत्पूर्वी संघातील खेळाडूंना बायो-बबलमधून विश्रांती देण्याचा निर्णय घेतलाय.

26 डिसेंबरला कसोटी सामन्याने भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होईल. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्यानंतर भारतीय संघाचा दौरा स्थगित होण्याची भीती निर्माण झाली होती. पण बीसीसीआय आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड यांच्यातील चर्चेनंतर दौरा निश्चित करण्यात आला. नियोजित वेळापत्रकात आठवड्याच्या अंतराचा बदल करुन दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील मालिका खेळवण्यात येणार आहे.

17 डिसेंबरपासूनच या दौऱ्याला सुरुवात होणार होती. यापरिस्थितीत न्यूझीलंड विरुद्धची मालिका आटोपून टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्याचा प्लॅन आखावा लागणार होता. यात खेळाडूंना बायोबबलमधून सुट्टटी मिळाली नसती. पण आता दौरा पुढे ढकलल्यामुळे टीम इंडियातील खेळाडूंना कुटुंबियांसोबत काही वेळ घालवता येणार आहे. इनसाईडच्या वृत्तानुसार, आफ्रिका दौऱ्यातील वेळापत्रकामध्ये बदल झाल्यानंतर बीसीसीआयने खेळाडूंना आठवडाभर बायोबबलमधून मोकळीक दिलीये. 12 डिसेंबरला दौऱ्यासाठी निवड झालेले खेळाडू मुंबईमध्ये रिपोर्टिंग करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT