क्रीडा

Virat Kohli : शतकासाठी संथ खेळला? खुद्द विराटनेच सांगितलं काय मेसेज आला ड्रेसिंग रूममधून

Kiran Mahanavar

Ind Vs Sa Virat Kohli : अखेर तो दिवस आला ज्याची करोडो चाहते वाट पाहत होते. विराट कोहलीने सचिनच्या 49 वनडे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. वर्ल्ड कप 2023 च्या 37व्या सामन्यात विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार शतक झळकावले. गेल्या दोन सामन्यांमध्ये विराटचे 49 वे शतक हुकले होते. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात या किंग कोहलीने हा टप्पा गाठला.

विराट कोहलीनेही ईडन गार्डन्सवर पहिले एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. आता त्याने याच मैदानावर सचिनच्या शतकाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. योगायोगाने विराट कोहलीने त्याच्या वाढदिवशीच सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली. ड्रेसिंग रूममधून विराटला काय मेसेज आला होता हे पण सांगितलं.

शतक झळकावल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, ही अशी विकेट होती ज्यावर फलंदाजी करणे कठीण होते. रोहित आणि शुभमनने संघाला चांगली सुरुवात करून दिली. ते चालू ठेवणे हे माझे काम होते. 10 व्या षटकानंतर चेंडू थांबून येत होता. त्यावेळी संघ व्यवस्थापनाने मला संथ खेळायला सांगितले. श्रेयस पण चांगला खेळला. आशिया कपदरम्यान आमच्यात खूप चर्चा झाली होती. कारण आम्ही तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो, त्यामुळे खेळाला पुढे नेण्यासाठी ही भागीदारी आवश्यक होती.

कोहली पुढे म्हणाला की, आमच्या संघात हार्दिक नाही, त्यामुळे आम्हाला माहित होते की एक किंवा दोन विकेट्स आम्हाला महागात पडू शकतात. तुमच्या वाढदिवशी या अप्रतिम मैदानावर एवढ्या मोठ्या चाहत्यांसमोर शतक झळकावणं खूप छान आहे. खेळपट्टी संथ आहे, आमच्याकडे दर्जेदार बॉलिंग लाइनअपही आहे, पण आम्हाला मेहनत करावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT