india vs sri lanka 2nd odi sakal
क्रीडा

IND vs SL: दुसऱ्या ODI मध्ये श्रीलंका करणार पलटवार! जाणून घ्या सामना कुठे पाहता येणार 'फ्री'

Kiran Mahanavar

India vs Sri lanka ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. गुरुवारी टीम इंडिया ईडन गार्डन्सवर उतरेल तेव्हा मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेण्याकडे लक्ष असेल. टीम इंडियाने हा सामना जिंकल्यास सलग तीन वनडे मालिकेतील पराभव टाळता येईल. गेल्या वर्षाच्या अखेरीस त्यांना न्यूझीलंडकडून 1-0 आणि बांगलादेशकडून 2-1 ने हरवले होते.

घरच्या मैदानावर भारतीय संघ मागील पाच एकदिवसीय मालिकेत हरलेला नाही. त्याने सर्व मालिका जिंकल्या. टीम इंडियाने आपल्या घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध एकही मालिका गमावलेली नाही. आतापर्यंत दोन्ही संघ 10 मालिकेत आमनेसामने आले असून टीम इंडियाने नऊ मालिका जिंकल्या आहेत. एक मालिका ड्रॉ झाली. एकूण रेकॉर्ड पाहता 1997 पासून भारताने श्रीलंकेविरुद्ध एकही वनडे मालिका गमावलेली नाही. दोन्ही संघांमध्ये एकूण 19 वनडे मालिका खेळल्या गेल्या आहेत. यादरम्यान भारताने 14 जिंकले आणि दोन गमावले. तीन मालिका बरोबरीत सुटल्या.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा वनडे कधी, कोठे आणि किती वाजता सुरू होईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना गुरुवार १२ जानेवारीला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळल्या जाणार आहे. नाणेफेक दुपारी 1 वाजता होईल.

सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होईल?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेचे प्रसारण करण्याचे अधिकार आहेत. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह पाहू शकता.

लाइव्ह मॅच मोफत कशी बघायची?

या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर पाहू शकता. यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pancard Update : एक चूक अन् 1 जानेवारी 2026 पासून तुमचं पॅन कार्ड होईल बंद..आत्ताच करून घ्या 'हे' एक काम, नाहीतर होईल मोठं नुकसान

Ranji Trophy 2025 : यशस्वी जैस्वालने झळकावले शतक; मुंबईचा पराभव टाळण्यासाठी ठोकला शड्डू, मुशीरची फिफ्टी, अजिंक्य अपयशी

Latest Marathi News Live Update : पुणे रेल्वे स्थानकासमोरील अतिक्रमणांवर कारवाई, वाहतूक कोंडी कमी होणार

मलायकाचा बॉयफ्रेंड? फिटनेस क्वीनसोबत दिसणारा तो मिस्ट्री मॅन कोण? अभिनेत्रीपेक्षा 17 वर्षांनी आहे लहान

Pune News: ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’, भरधाव वेगामुळे अपघात; बंडगार्डन मेट्रो स्थानकाजवळील घटनेबाबत पोलिसांचा अंदाज

SCROLL FOR NEXT