India vs Sri lanka 2nd ODI dream11
India vs Sri lanka 2nd ODI dream11 
क्रीडा

IND vs SL: इशान अन् सूर्या पुन्हा राखीवच! गोलंदाजी 'ही' भारतासाठी डोकेदुखी

Kiran Mahanavar

India vs Sri lanka ODI : पहिल्या सामन्यात ३७३ धावा करूनही केवळ ६७ धावांचा विजय हाती लागलेल्या भारताला अंतिम षटकातील गोलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे.

तरच आजचा सामना जिंकून श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकण्याचे उद्दिष्ट पार करता येईल. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या फॉर्ममुळे फलंदाजीची चिंता राहिलेली नाही.

डेथ ओव्हरमधील (अंतिम षटकांतील) गोलंदाजी ही भारतासाठी डोकेदुखी राहिलेली आहे. जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीमुळे ही कमकुवत बाजू प्राकर्षाने जाणवत आहे.

गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला भलीमोठी धावसंख्या उभारल्यामुळे विजय सोपा झाला असला, तरी डेथ ओव्हरमधील गोलंदाजी कधीही दगा देऊ शकते.

कालच्या पहिल्या सामन्यात ३७३ धावा उभाल्यानंतर भारताने श्रीलंकेची ३७.५ षटकांत ८ बाद २०६ अशी अवस्था केली होती, परंतु पुढच्या १२.१ षटकांत दासून शनाका आणि कासून रजिथा ही जोडी भारतीयांना फोडताच आली नाही, उलट १०० धावांचीही खैरात केली.

श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने ८८ चेंडूत नाबाद १०८ धावा करून भारतीय गोलंदाजांचा मर्यादा स्पष्ट केल्या होत्या. श्रीलंकेने हा सामना गमावला असला तरी शनाकाच्या या खेळीमुळे त्यांना उद्याच्या सामन्यासाठी निश्चितच स्फूर्ती मिळाली आहे.

तीनशे धावांच्या आसपासचे आव्हान आपण पार करू शकतो, हा आत्मविश्वास श्रीलंकेच्या संघाने पराभूत सामन्यातून मिळवला आहे, त्यामुळे भारतीयांना डेथ ओव्हरमधील गोलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे.

मदुशंका जखमी

पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दिलशान मदुशंकाचा खांदा दुखावला होता. त्याची क्ष किरण चाचणी करण्यात आली आहे. त्याच्या अहवालानंतर उद्याच्या सामन्यात त्याला खेळवले जाईल. गुवाहाटीतील सामन्यात त्याने पदार्पण केले होते.

रोहितसाठी फेवरेट मैदान

रोहित शर्मासाठी मुंबईतील वानखेडे हे घरचे मैदान असले, तरी कोलकातातील ईडन गार्डन हे त्याच्यासाठी सर्वांत फलदायी मैदान आहे. येथे त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत.

आयपीएलमधील सामन्यांतही त्याची बॅट येथे तळपलेली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात ईडन गार्डनवर याअगोदर आठ वर्षांपूर्वी झालेल्या सामन्यात रोहितने २६४ धावांची विक्रमी खेळी साकार केली होती.

ईशान, सूर्यकुमार पुन्हा राखीवच

एक दिवसाच्या अंतराने होणाऱ्या या दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे, त्यामुळे ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना राखीव खेळाडूतच राहावे लागेल.

शुभमन गिलने ७० धावांची खेळी करून विश्वास सार्थ ठरवला होता; तर राहुलनेही संधी मिळताच आक्रमक फलंदाजी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT