Virat Kohli Sakal
क्रीडा

किंग कोहलीवर 40 कसोटीनंतर पहिल्यांदाच आली ही वेळ!

सकाळ डिजिटल टीम

श्रीलंकेविरुद्धच्या बंगळुरु कसोटी सामन्यातही भारताचा स्टार फंलदाज विराट कोहलीचे 71 वे शतक लांबणीवर पडले. पहिल्या डावात 23 धावा करणाऱ्या कोहलीला दुसऱ्या डावात 13 धावांवरच माघारी फिरावे लागले. या सामन्यातील 36 धावांसह 71 व्या शतकासोबत छत्तीसचा आकडा निर्माण झाल्याची परिस्थिती त्याच्यावर ओढावली.

पहिल्या डावात ऑफ स्पिनर धनंजयने पायचित केले. दुसऱ्या डावात तो जयविकर्माच्या गोलंदाजीवर पायचित झाला. विकेट गमावल्यानंतर त्याला नाराजी लपवता आली नाही. या सामन्यातील अपयशासह मागील 40 कसोटीनंतर पहिल्यांदाच कोहलीची सरासरी पन्नाशीच्या आत आलीये.

मोहाली कसोटी सामन्यानंतर कोहलीची कसोटी सरासरी 50.46 होती. बंगळुरु कसोटी सामन्यातील फ्लॉप शोमुळे ती आता 49.95 वर आलीये. याआधी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातच 2017 कोलकाता कसोटी सामन्यात त्याची सरासरी 50 च्या आत आल्याचे पाहायला मिळाले होते.

मोहालीच्या मैदानातील कसोटी सामन्यात विराट कोहली शंभरावा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. या ऐतिहासिक सामन्यात कोहलीने सुरुवात चांगली केली. त्याने चाळीस धावांचा टप्पाही पार केला. अर्धशतकापासून पाच धावा दूर असताना एम्बुल्डेनियानं त्याला बोल्ड केलं होते. श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी सामन्यात कोहलीचा शतकी दुष्काळ संपेल असे वाटत होते. पण त्याला दोन्ही कसोटी सामन्यातील तीन डावात मिळूनही शंभर धावा करता आल्या नाही. मोहाली कसोटीत 45 धावा आणि दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 23 आणि 13 धावा अशा एकूण 81 धावाच तो करु शकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Nasrapur crime: आरोपीला मध्यरात्री घटनास्थळी नेले अन्... ; नसरापूर अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

Angarki Sankashti 2026 : गणपतीपुळेत लोटला भाविकांचा महासागर! अंगारकीला 70 हजार भक्तांनी घेतले दर्शन; 80 लाखांची उलाढाल

Jalna Crime: पारधमध्ये ‘लव्ह जिहाद’! दहा वर्षांपासून पीडितेवर अत्याचार, जालन्यातून दोन संशयित अटकेत!

Ganga Godavari Maha Aarti : नाशिकमध्ये आज गंगा-गोदावरी महाआरती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा, वाहतुकीत मोठे बदल

Latest Marathi News Live Update : रायगडात पाणीटंचाईचा धोका वाढला; २८ धरणांत केवळ २९ टक्के पाणीसाठा शिल्लक

SCROLL FOR NEXT