kuldeep yadav may drop from team india playing 11 
क्रीडा

IND vs SL: कुलदीप यादव शेवटच्या ODI सामन्यातून बाहेर! 'या' कारणावरून पडला प्रश्न

मॅन ऑफ द मॅच अन् पुढच्या सामन्यात ड्रॉप....

Kiran Mahanavar

IND vs SL 3rd ODI Match: टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या ODI मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 4 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात चायनामन गोलंदाज कुलदीप यादव भारताच्या विजयाचा हिरो ठरला. त्याला या सामन्यात दुखापतग्रस्त युजवेंद्र चहलच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली होती.

कुलदीपने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि तो सामनावीरही ठरला. या शानदार खेळानंतरही पुढील सामन्यातून त्याला संघाच्या प्लेइंग 11 मधून वगळले जाऊ शकते, असे मानले जात आहे. (kuldeep yadav may drop from team india playing-11)

या सामन्यात कुलदीप यादवने 10 षटके टाकत 51 धावा देत 3 विकेट घेतल्या. या शानदार खेळानंतरही कुलदीप तिसऱ्या वनडेतून बाहेर पडणार असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. खरं तर, कुलदीप यादवने बांगलादेश दौऱ्यावर एकाच कसोटीत 8 विकेट घेत सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. पुढच्याच सामन्यात त्याला संघातून वगळण्यात आले होते, त्यामुळे या वेळीही असेच काहीसे संघ व्यवस्थापन हे करू शकते असा विश्वास चाहत्यांना आहे.

दुसऱ्या वनडेत शानदार खेळ केल्यानंतर कुलदीप यादव ट्विटरवर ट्रेंड करू लागला. संघ व्यवस्थापनाला त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल चाहते ट्रोल करताना दिसत आहे. एका ट्विटर युजरने लिहिले की, 'कुलदीप यादवला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळाला. आता त्याला पुढील सामन्यात वगळण्याची तयारी आहे. त्याच वेळी, एका आजुन ट्विटर युजरने लिहिले की, कुलदीपचे आयुष्य असे आहे. दररोज पिकअप करा, चांगले खेळा, मॅन ऑफ द मॅच व्हा आणि पुढच्या सामन्यात ड्रॉप करा.

कुलदीप यादवने भारतासाठी आतापर्यंत 8 कसोटी, 74 एकदिवसीय आणि 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 34, एकदिवसीय सामन्यात 122 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये एकूण 44 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 126 विकेट्स घेतल्या आहेत. एवढेच नाही तर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 34 सामन्यांमध्ये एक शतक आणि 6 अर्धशतकांसह 874 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेतील शोधमोहीम ८३ तासांनी संपली; अखेरच्या बेपत्ता कामगाराचाही मृतदेह सापडला, मृतांचा आकडा ९ वर

आजचे पंचांग 12 जुलै 2026! प्रदोष, शिवरात्री, राहुकाळ आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Sangli Politics : जयंत पाटलांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांचे पद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आता 15 दिवसांत काय होणार?

IND vs ENG 5th T20I: भारतीय संघाचा सुपडा साफ! इंग्लंडने मालिका ४-० ने खिशात घातली; श्रेयस अय्यरच्या संघाचे वस्त्रहरण...

Cheese Omelette Paratha: ब्रेड-ऑम्लेटला द्या ब्रेक! रविवारी बनवा हा भन्नाट चिज ऑम्लेट पराठा

SCROLL FOR NEXT