IND vs SL: Playing-11 sakal
क्रीडा

IND vs SL: Playing-11 मध्ये थेट एन्ट्री! रोहित 'या' खेळाडूची कारकीर्द वाचवणार?

Kiran Mahanavar

India vs Sri Lanka 3rd ODI Playing 11: भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेवर कब्जा केला आहे. अनुभवी सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने मालिकेतील दुसऱ्या वनडेत 4 गडी राखून विजय मिळवला. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे 15 जानेवारीला तिरुअनंतपुरममध्ये खेळला जाणार आहे. कर्णधार रोहित शर्मा त्या सामन्यात प्लेइंग-11 मध्ये बदल करू शकतो. मालिकेत एकही वनडे खेळलेला नाही अशा खेळाडूला तो थेट एन्ट्री करू शकतो.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेत दोन सामने झाले आहेत. कर्णधार रोहित शर्माने एका खेळाडूला बेंचवर बसुन ठेवले आहे. आता भारताने वनडे मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा प्लेइंग-11 मध्ये प्रयोग करू शकतो. भारताच्या ज्या खेळाडूचा उल्लेख केला जात आहे तो युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आहे. अर्शदीपने भारतासाठी आतापर्यंत 3 वनडे खेळले आहेत. गेल्या नोव्हेंबरमध्येच त्याने या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते.

अर्शदीप सिंगने भारतासाठी आतापर्यंत 3 वनडे आणि 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला एकही विकेट मिळालेली नाही. या फॉरमॅटमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट 6.75 आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 36 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या एकूण टी-20 कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 74 सामन्यात 92 विकेट घेतल्या आहेत.

अर्शदीपला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय मालिकेत संधी देण्यात आली होती. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली अर्शदीपने मालिकेतील तिन्ही सामने खेळले पण त्याचे खाते रिकामेच राहिले. संपूर्ण मालिकेत त्याला एकही विकेट घेता आली नाही. अर्शदीप देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करतो आणि त्याने प्रथम श्रेणीमध्ये 6 सामने, लिस्ट ए मध्ये 20 सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणीमध्ये त्याने 2.87 च्या इकॉनॉमी रेटने 21 विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT