Washington Sundar Set To Replace Injured Axar Patel In India's Squad Ahead Of Asia Cup 2023 Final sakal
क्रीडा

IND vs SL : अक्षर पटेल का गेला बाहेर? 'या' स्टार अष्टपैलू खेळाडूची फायनलपूर्वी टीम इंडियात अचानक एन्ट्री

Kiran Mahanavar

IND vs SL Asia Cup 2023 Final Washington Sundar : आशिया कप 2023 अंतिम सामना 17 सप्टेंबरला भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय संघात एका नव्या खेळाडूची अचानक एन्ट्री होणार आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आहे ज्याला श्रीलंकेत बोलावण्यात आले आहे.

अक्षर पटेल का गेला बाहेर?

भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलच्या बांगलादेशविरुद्धच्या सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यादरम्यान त्याच्या मनगटावर चेंडू लागला होता. हा चेंडू त्याच्या गोलंदाजी करतो त्या हाताला लागला होता. क्रिकबझच्या मते, तो श्रीलंकेविरुद्धच्या आगामी आशिया कप 2023 च्या विजेतेपदाच्या सामन्यातून बाहेर पडू शकतो. ज्याच्या दुखापतीबद्दल पूर्णपणे माहिती नाही. भारतीय संघ व्यवस्थापनाने खबरदारी म्हणून सुंदरला कोलंबोला बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.

वॉशिंग्टन सुंदरची यापूर्वी आशिया कपसाठी निवड झाली नव्हती, तर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात त्याला स्थान मिळाले होते. सध्या तो टीमच्या इतर खेळाडूंसह बेंगळुरूमध्ये होता. आशिया कपच्या अंतिम फेरीनंतर तो पुन्हा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या शिबिरात सहभागी होईल, अशी अपेक्षा आहे.

सुंदर हा ऑफ ब्रेक गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे फलंदाजीतही योगदान देण्याची क्षमता आहे. अशा परिस्थितीत अक्षर पटेल बाहेर गेला तरी टीम इंडियाला जास्त काही फटका मोठा बसणार नाही. त्याने या वर्षी जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT