India vs Sri lanka Asia Cup 2023 sakal
क्रीडा

IND vs SL : टीम इंडियाचा 16 तासात दुसरा सामना! रोहित घेणार मोठा निर्णय, श्रीलंकेविरुद्ध हे दोन खेळाडू जाणार बाहेर?

Kiran Mahanavar

India vs Sri lanka Asia Cup 2023 : टीम इंडियाने आशिया कपच्या सुपर-4 फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 228 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला, पण भारतासाठी पुढील वाटचाल सोपी नसणार आहे. कारण पाकिस्तानला हरवल्यानंतर 16 तासांत रोहित शर्माची टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. सुपर-4 मध्ये त्याची दुसरी लढत आज श्रीलंकेशी होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 10 सप्टेंबरला होता, परंतु पावसामुळे राखीव दिवस देखील वापरण्यात आला. अशा स्थितीत भारतीय संघ रविवार आणि सोमवार असे दोन दिवस मैदानात खेळत होता.

आता टीम इंडियाला मंगळवारी 12 सप्टेंबरला श्रीलंकेचा सामना करायचा आहे. म्हणजेच टीम इंडियाचे खेळाडू सलग तिसऱ्या दिवशी मैदानात उतरतील. अशा स्थितीत कामाचा ताण आणि पुढे वर्ल्डकप लक्षात घेऊन भारतीय संघ व्यवस्थापनाला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग-11 निवडताना काही मोठे निर्णय घेण्याची शकतात आहे.

तसे पाहता आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारतासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. भारताने हा सामना जिंकल्यास अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. मात्र, पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकणाऱ्या काही खेळाडूंना टीम इंडियाला विश्रांती द्यावी लागणार आहे.

विशेषतः केएल राहुल जो दुखापतीतून सावरल्यानंतर इंडियात परतला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने सुमारे 3 तास फलंदाजी केली आणि शतकही झळकावले. यानंतर दुसऱ्या डावातही त्याने 32 षटके मैदानात विकेटकीपिंग सुधा केली होता. अशा स्थितीत त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. कारण तो दुखापतीतून बरा होऊन नुकताच परतला आहे आणि पुढे आशिया कप फायनल आणि वर्ल्ड कप आहे.

राहुलच्या जागी इशान किशनला संधी दिली जाऊ शकते. तोही चांगल्या फॉर्ममध्ये असून श्रेयस अय्यरची दुखापत बरी न झाल्यास त्याच्या जागी सूर्यकुमार यादव खेळू शकतो. टॉप-थ्रीमध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही. रोहित, शुभमन आणि विराट खेळतील.

कर्णधार रोहित शर्मा गोलंदाजीतही बदल करू शकतो. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पांड्या यांच्या कामाचा ताण लक्षात घेता प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद शमी संघात येऊ शकतात.

कोलंबोमधील हवामान खूप दमट आहे. यात सिराज आणि बुमराहने गोलंदाजी केली आणि जवळपास वर्षभरानंतर बुमराह संघात परतला आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला त्याच्यासोबत कोणताही धोका पत्करायचा नाही. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याला विश्रांती दिली जाऊ शकते आणि कृष्णा-शमीसोबत भारतीय संघ मैदानात उतरू शकते.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचे संभाव्य प्लेइंग-11 : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसीध कृष्णा आणि कुलदीप यादव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT