IND Vs SL  ESAKAL
क्रीडा

IND Vs SL : मोहम्मद शामीचा पंजा, लंकेचं 55 धावात दहन; 302 धावांनी विजय मिळवत भारत सेमी फायनलमध्ये दाखल

Kiran Mahanavar

India vs Sri Lanka Live Score Cricket World Cup 2023 : भारताच्या 358 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण डाव 55 धावात संपुष्टात आला. भारताने श्रीलंकेवर 302 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने यंदाच्या वर्ल्डकपमधील आपला सलग 7 वा सामना जिंकत दिमाखात सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. सेमी फायनल गाठणारी भारत ही पहिली टीम ठरली.

भारताकडून मोहम्मद शामीने दमदार गोलंदाजी करत 18 धावात 5 विकेट्स घेतल्या. त्याला मोहम्मद सिराजने 3 तर जसप्रीत बुमराहने 1 विकेट्स घेतल्या. श्रीलंकेकडून कुसल रजिताने सर्वाधिक 14 धावा केल्या. महीष तिक्षाणा आणि अँजेलो मॅथ्यूजने प्रत्येकी 12 धावांचे योगदान दिले.

तत्पर्वी, भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने श्रीलंकेविरूद्ध 50 षटकात बाद 357 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर शुभमन गिलने 92 विराट कोहलीने 88 तर श्रेयस अय्यरने 82 धावांची खेळी केली. दुर्दैवाने भारताच्या एकाही फलंदाजाचे आज शतक पूर्ण झाले नाही. स्लॉग ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी करत रविंद्र जडेजाने 24 चेंडूत 35 धावांचे योगदान दिले.

श्रीलंकेकडून डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाने रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांची शिकार करत आपला पंजा पूर्ण केला. केएल राहुल दुश्मंता चमिराच्या गोलंदाजीवर 21 धावा करून बाद झाला.

29-8 : मोहम्मद शामीने दिला अजून एक धक्का 

मोहम्मद शामीने चमिराला शुन्यावर आणि अँजेलो मॅथ्यूजला 12 धावांवर बाद करत लंकेला दोन धक्के दिले.

14-6 (9.5 Ov) : मोहम्मद शामीने दिले पाठोपाठ दोन धक्के

बुमराह आणि सिराजने लंकेची टॉप ऑर्डर उडवल्यानंतर मोहम्मद शमीने आपल्या स्पेलच्या पहिल्याच षटकात सलग दोन विकेट्स घेत लंकेची अवस्था 6 बाद 14 धावा अशी केली.

3-4 : मोहम्मद सिराजने लावला सुरूंग

भारताने 378 धावांचे आव्हान पार करताना श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात लंकेला पहिला धक्का दिला. त्यानंतर मोहम्मद सिराजने तीन विकेट्स घेत लंकेची अवस्था 4 बाद 3 धावा अशी केली.

357-8 (50 Ov) : जडेजाची उपयुक्त खेळी

रविंद्र जडेजाने 35 धावांची उपयुक्त खेळी करत भारताला 50 षटकात 8 बाद 357 धावांपर्यंत पोहचवले.

333-6 : श्रेयस अय्यर देखील शतकाच्या उंबरठ्यावर बाद 

केएल राहुल बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत 56 चेंडूत 82 धावा केल्या. अय्यरने 6 षटकार 3 चौकाराने ही खेळी सजवली. मात्र शतकाच्या जवळ पोहचला असताना तसेच स्लॉग ओव्हरमधील शेवटची दोन षटके राहिली असताना तो दिलशान मदुशंकाची पाचवी शिकार झाला.

केएल राहुल देखील विराटसारखाच बाद 

विराट कोहली बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी अर्धशतकी (60) भागीदारी रचली. मात्र स्लॉग ओव्हर सुरू होण्यापूर्वीच राहुल 21 धावा करून बाद झाला.

225-3 (35 Ov) : राहुल - अय्यरने डाव सावरला 

विराट कोहली आणि शुभमन गिल हे दोन शतकाच्या जवळ पोहचल्यानंतर बाद झाले. भारताचे दोन्ही सेट फलंदाज बाद झाल्यामुळे भारताच्या धावगतीवर परिणाम होण्याची भिती होती. मात्र श्रेयस अय्यर आणि केएल राहुलने धावगती जास्त कमी न होऊ देता भारताला 225 धावांपर्यंत पोहचवले.

मुंबईच्या कडक उन्हात गिल तळपला! पण शतक हुकले, भारताला दुसरा धक्का

कोहली- गिलने लंकेवर चढावला हल्ला! दोघांनी ठोकले खणखणीत अर्धशतक

शुभमन गिलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. गिलने 55 चेंडूंत आपले अर्धशतक झळकावले, ज्यात आठ चौकारांचा समावेश होता.

किंग कोहलीची दमदार खेळी, ठोकले अर्धशतक अन् लंकेवर चढावला हल्ला

विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. कोहलीने 50 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने ही कामगिरी केली. भारताची धावसंख्या 16.4 षटकात एका विकेटवर 104 धावा.

कर्णधार 'क्लीन बोल्ड'! कोहली- गिलने लंकेवर चढावला हल्ला

चार धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिलने डावाची धुरा सांभाळली. दोघांनी मिळून 80 हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. 14 षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 85 धावा आहे. सध्या विराट 39 धावा करून क्रीजवर आहे तर शुभमनने 34 धावा केल्या आहेत.

पाच षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 25 धावा आहे. विराट कोहली 10 आणि शुभमन गिल 9 धावांवर खेळत आहे.

IND Vs SL Live Score : कर्णधार 'क्लीन बोल्ड'! रोहितने पहिल्या चेंडूवर मारला चौकार अन् पुढच्याच चेंडूवर 'खेळ खल्लास'

भारतीय कर्णधार रोहित शर्माने चौकाराने सुरुवात केली, पण दुसऱ्याच चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला. त्याची विकेट दिलशान मधुशंकाने घेतली. रोहितला फक्त 4 धावा करता आल्या.

श्रेयस अय्यर अन् सूर्यकुमार खेळणार, जाणून घ्या प्लेइंग-11

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

श्रीलंका : पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (कर्णधार/विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, दुशान हेमंथा, अँजेलो मॅथ्यूज, महिष तिक्षना, कसून राजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकली

श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. धनंजय डी सिल्वाच्या जागी फिरकीपटू दुशान हेमंताचा संघात समावेश करण्यात आला आहे.

त्याचबरोबर भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच श्रेयस अय्यर, सूर्यकुमार खेळताना दिसणार आहेत.

वादळी वाऱ्यासह पावसाची नाय तर प्रदूषणाने वाढवली भारत-श्रीलंकेची चिंता; कसे असेल मुंबईचे हवामान

Accuweather च्या वेबसाईटनुसार, गुरुवारी मुंबईचे हवामान स्वच्छ असणार आहे. पावसाची शक्यता फक्त 2 टक्के आहे. मात्र, दव पडण्याची शक्यता आहे. अहवालानुसार हवामान स्वच्छ राहिल्यास चाहत्यांना नॉन-स्टॉप क्रिकेट पाहायला मिळेल. दोन्ही संघांसाठी येथे नाणेफेक महत्त्वाची ठरणार आहे. येथे नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार फलंदाजी निवडू शकतो. या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध 382 धावा केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT