ind vs sl rahul dravid not travel with team india  
क्रीडा

IND vs SL: टीम इंडियाला मोठा धक्का! रात्री उशिरा 'या' दिग्गजाची बिघडली तब्येत

मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का...

Kiran Mahanavar

India vs Sri lanka : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 4 विकेटने जिंकला. मालिकेतील शेवटचा सामना 15 जानेवारीला तिरुअनंतपुरम येथे खेळल्या जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. अचानक संघातील एका महत्त्वाच्या सदस्याची तब्येत बिघडली, त्यामुळे हा दिग्गज कोलकाताहून आपल्या घरी परतला असून तो शेवटच्या सामन्यात संघासोबत दिसणार नाही.(rahul dravid not travel with team india)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड प्रकृती खालावल्याने कोलकाताहून बंगळुरू येथील त्यांच्या घरी परतले आहेत. मालिकेच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी द्रविडला हॉटेलमध्येच अस्वस्थ वाटत होते. त्याचा रक्तदाब वाढला होता. औषध सेवन केल्यानंतर तो कोलकात्याच्या सामन्यादरम्यान थांबला होता. बंगाल क्रिकेट बोर्डाने द्रविडसाठी डॉक्टर उपलब्ध करून दिला होता. अशा परिस्थितीत तो तिरुअनंतपुरममध्ये तिसऱ्या वनडेत भारतीय संघासोबत दिसणार नसल्याचे मानले जात आहे.

या मालिकेदरम्यान राहुल द्रविडने संघातील खेळाडूंसोबत आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. राहुल द्रविडने 1996 मध्ये टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केले. राहुल द्रविडने टीम इंडियासाठी 164 कसोटी सामन्यांमध्ये 13288 धावा केल्या आहेत, ज्यात 36 शतके आणि 63 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने 344 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10889 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 12 शतके झळकावली आहेत. त्याने भारतासाठी 1 टी-20 सामनाही खेळला आहे. आता तो भारतीय संघासोबत अनेक वर्षांपासून प्रशिक्षक म्हणून काम करत आहे.

मालिकेतील दुसऱ्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी केली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करताना श्रीलंकेच्या संघाला 215 धावांत गारद केले होते. टीम इंडियाने हे लक्ष्य 6 विकेट्स गमावूनच गाठले. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 64 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT