Team India KBPHOTOGRAPHY
क्रीडा

जडेजाचा रॉकस्टार परफॉमन्स; तिसऱ्या दिवशीच लंकेचा खेळ खल्लास!

सकाळ डिजिटल टीम

मोहाली : भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धचा (India vs Sri Lanka 1st Test) पहिला कसोटी सामना तिसऱ्या दिवशीच जिंकला. पहिल्या डावात डोंगराएवढे लक्ष्य ठेवल्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव 174 धावांत आटोपला. कॅप्टन्सीच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) प्रतिस्पर्ध्यांना फॉलोऑन दिला होता. श्रीलंकेने आपल्या दुसऱ्या डावातही 'ये रे माझ्या मागल्या...' शो दाखवला. डिक्वेलाच्या अर्धशतकाशिवाय एकालाही मैदानात तग धरता आला नाही. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि आर अश्विनच्या (Ravichandran Ashwin) फिरकीसमोर श्रीलंकेचा दुसरा डाव 178 धावांत आटोपला. भारतीय संघाने डावासह 222 धावांनी सामना खिशात घातला. या विजयासह टीम इंडियाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाने उभारली होती मोठी धावसंख्या

मोहालीच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने पहिल्या डावात 8 बाद 574 धावांवर डाव घोषित केला होता. भारताकडून सर्वाधिक 175 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या रविंद्र जडेजाने गोलंदाजीतही कमाल करुन दाखवली. पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात रविंद्र जाडेजा आणि आर अश्विन दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट घेतल्या. मोहम्मद शमीने दोन विकेट मिळवून देत महत्त्वपूर्ण योगदान दिले. पहिला डाव अर्धशतकाविना खेळणाऱ्या श्रीलंकेकडून दुसऱ्या डावात डिक्वेलानं नाबाद 51 धावांची खेळी केली. त्याला कोणीही साथ दिली नाही.

भारतीय संघाकडून जडेजाने कुटल्या सर्वाधिक धावा

मयांक अग्रवाल 33 (49) आणि रोहित शर्मा 29(28) स्वस्तात माघारी फिरल्यानंतर हनुमा विहारीनं 58 (128) संघाचा डाव सावरला. शंभरावा कसोटी सामना खेळणारा विराट कोहली 45 (76) अर्धशतकाला मुकला तर पंत 96 (97) शतकापासून 4 धावांनी दूर राहिला. अय्यर 27 धावांवर बाद झाला. अश्विनने 61 धावांची तर रविंद्र जडेजाने नाबाद 175 धावा केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT