IND vs SL Video Sakal
क्रीडा

IND vs SL Video : कोहलीचा फॅन आला मैदानात अन् सुर्यकुमार झाला फोटोग्राफर

सकाळ डिजिटल टीम

भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन वनडे सामने खेळले गेले. तर काल झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने बाजी मारत लंकेला ३-० अशी धूळ चारली. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शानदार शतक करत नाबाद १६६ धावा केल्या. याबरोबर त्याने वनडे कारकिर्दीतील ४६ वे आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७४ वे शतक झळकावले.

हेही वाचा - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

तर सामन्यादरम्यान एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. सुरक्षा कवच तोडून विराट कोहलीचे दोन तरूण चाहते मैदानात घुसले आणि त्यांनी थेट विराटलाच गाठले. त्यातील एकाने विराटचे पाय धरल्याचा फोटो व्हायरल होत असून त्यानंतर विराटसोबत फोटो काढण्यासाठी त्यांनी फोन काढला.

Virat Kohli
Virat Kohli

दरम्यान, विराटच्या चाहत्याचं प्रेम पाहून सुर्यकुमार यादवने फोन हातात घेऊन त्यांचे फोटो काढले. चाहत्यांसाठी सुर्या फोटोग्राफर बनला अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर या घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी त्यांना मैदानाबाहेर नेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT