Ravindra Jadeja And Rohit Sharma Sakal
क्रीडा

जडेजा द्विशतकाच्या उंबरठ्यावर असताना डाव का घोषित केला? रोहित म्हणाला..

सकाळ डिजिटल टीम

जडेजाला द्विशतकाची संधी असताना डाव घोषित केल्यानं कर्णधार रोहित शर्माला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आलं.

मोहाली कसोटीत भारताने श्रीलंकेला २२२ धावांनी पराभूत केलं. या सामन्यात भारताकडून रविंद्र जडेजाने अष्टपैलू खेळी केली. त्यानं या सामन्यात १७५ धावांची नाबाद खेळी केली. तसंच दोन्ही डावात मिळून ९ गडी बाद केले. दरम्यान, या सामन्यात जडेजाला द्विशतकाची संधी असताना डाव घोषित केल्यानं कर्णधार रोहित शर्माला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आलं. यावर रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित शर्माने सांगितलं की, संघाचा आणि रविंद्र जडेजाचा हा निर्णय होता की, आपल्याला डाव घोषित करायला हवा. यातून हेच सिद्ध होतं की, तो किती निस्वार्थी खेळाडू आहे. सामन्यानंतर रोहित शर्माने जडेजावर कौतुकाचा वर्षाव केला. त्यानं म्हटलं की, रविंद्र जडेजा या सामन्यात जबरदस्त खेळला. त्यानं फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्हीत योगदान दिलं. अखेरच्या वेळी गोलंदाजीत केलेल्या बदलाबद्दल सांगताना रोहित शर्मा म्हणाला की, जडेजा ऐवजी जयंत यादवकडे चेंडू सोपवला कारण आम्हाला त्याला संधी द्यायची होती.

मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या फलंदाजीवेळी जडेजाने तुफान खेळी केली. जडेजा १७५ धावांवर खेळत असताना संघाचा डाव घोषित कऱण्यात आला. चहापानासाठी काही वेळ बाकी असतानाच असा निर्णय घेतला गेला होता.

रोहित शर्माच्या निर्णयानंतर जडेजाचं द्विशतक झाल्यावर डाव घोषित करायला हवा होता अशी चर्चा क्रिकेटप्रेमींनी सुरु केली. तसंच प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही प्रश्न विचारले गेले. कारण याआधी राहुल द्रविड कर्णधार असताना सचिन तेंडुलकर १९४ धावांवर खेळताना डाव घोषित करण्यात आला होता. याचे कनेक्शन जडेजाच्या १७५ धावांवेळी डाव घोषित करण्याशी जोडून सोशल मीडियावरून टीका सुरु होती.

लंकेविरुद्धच्या कसोटीत भारताने पहिल्या डावात ५७४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल लंकेचा पहिला डाव १७४ धावात तर दुसरा डाव १७८ धावांवर गुंडाळला. भारताने ही कसोटी एक डाव आणि २२२ धावांनी जिंकला. पुढचा सामना बेंगळुरुत खेळण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

LPG E-KYC Mandatory : सिलिंडर हवाय? मग आधी 'हे' काम करा; गॅस केवायसीसाठी सरकारने दिली नवीन सोय

Gudi Padwa 2026 Recipes: साखरेच्या गाठी बाजारातून विकत घेण्याऐवजी घरीच तयार करा; इतकी सोपी रेसिपी तुम्हाला कुठेच नाही मिळणार

Kagal MIDC Accident : दुबईहून सुट्टीला आलेल्या १३ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Pune ZP President Election : पुणे जिल्हा परिषदेसाठी अखेर अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचे उमेदवार ठरले; दोन्ही पदे राष्ट्रवादीकडेच राहणार

SCROLL FOR NEXT