Virat Kohli  Sakal
क्रीडा

VIDEO : शतकी फिक्र को...भर मैदानात किंग कोहली झाला बुमराह

सुशांत जाधव

भारतीय संघ एका मागून एक मालिका सुरु असताना विराट कोहली शतकाची मालिका खंडीत झालीये. बंगळुरुच्या मैदानात पुन्हा तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. कॅप्टन्सीतून मुक्त झाल्यानंतर विराट कोहली एक फलंदाज म्हणून मैदानात उतरतोय. एक खेळाडू म्हणून मैदानात वावरताना तो आपल्या हटके अंदाजामुळे चर्चेत आलाय. भारत श्रीलंका यांच्यातील सामना सुरु असताना फिल्डिंगवेळी कोहली मॅच पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसून आले.

मोठी खेळी करण्यात अपयश येत असले तरी कोहलीला त्याची फार चिंता वाटत नाही. मैदानातील त्याच्या हावभाव तर तो आनंद घेत क्रिकेट खेळत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. विराट कोहली फिल्डिंगवेळी जसप्रित बुमराहच्या गोलंदाजी शैलीची नक्कल करताना दिसले. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात विराट कोहलीसह संघातील अन्य खेळाडूही दिसते. याआधीही कोहली अन्य गोलंदाजांची कॉपी करताना पाहायला मिळाले आहे .

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील विजयानंतर भारतीय संघ बंगळुरुच्या मैदानात दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी उतरला आहे. मोहाली कसोटी विराट कोहलीसाठी शंभरावी कसोटी होती. या सामन्यातही त्याला मोठी खेळी करता आली नाही. बंगळुरुमध्ये त्याने संयमी खेळ दाखवला. पण पुन्हा तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याच्या 71 व्या शतकाची प्रतिक्षा आणखी वाढली आहे. मोठी खेळी करण्यात यश येत नसले तरी विराटने याचा कोणताही दबाव घेतलेला नाही. मैदानातील त्याची कृती हेच सांगणारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT