India vs West Indies 1st Test sakal
क्रीडा

IND vs WI : पहिल्या कसोटी सामन्यात रोहितच्या एका निर्णयाने 'या' खेळाडूची कारकीर्द संपली!

Kiran Mahanavar

India vs West Indies 1st Test : टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा सुरू झाला आहे. सर्व प्रथम दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळल्या जाणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे खेळला जात आहे.

या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि ईशान किशन या युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली. त्याचवेळी कर्णधार रोहित शर्माने अशा खेळाडूचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केला नाही, जो 2 वर्षांनंतर भारतीय संघात परतला होतो.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी एका खेळाडूला भारतीय संघात स्थान मिळाले आहे, जो गेल्या 2 वर्षांपासून टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडत होता. हा खेळाडू दुसरा कोणी नसून वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आहे.

नवदीप सैनीला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले आहे. दुखापतीमुळे आणि काही काळ संघाबाहेर राहिल्यामुळे नवदीप सैनीच्या कारकिर्दीला ब्रेक लागला होता. आता तो 2 वर्षांनंतर परतला आहे. मात्र या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळले नाही.

नवदीप सैनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत भारतासाठी 2 कसोटी सामने, 8 एकदिवसीय सामने आणि 11 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटी सामन्यात 4, एकदिवसीय सामन्यात 6 आणि टी-20 मध्ये 13 बळी घेतले आहेत.

नवदीपने 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला. डिसेंबर 2019 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्येही पदार्पण केले. त्याच वेळी, 2021 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर, नवदीप सैनीला प्रथमच भारताकडून कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना 2 वर्षांपूर्वी श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.

डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज यांचा वेगवान गोलंदाज म्हणून प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांची फिरकीपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताचा प्लेइंग-11 : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT