India vs West Indies 2nd ODI 
क्रीडा

IND vs WI: 'मी ससा नसून कासव...' विंडीजविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार पांड्या संतापला!

Kiran Mahanavar

India vs West Indies 2nd ODI : कॅरेबियन संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती, त्यामुळे हार्दिक पांड्याला कर्णधारपदाची संधी मिळाली. मात्र या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.

संघाच्या फलंदाजी निराशाजनक कामगिरी आणि गोलंदाजीतही शार्दुल ठाकूरशिवाय कोणीही आपली छाप सोडू शकले नाही. संघाच्या या दारुण पराभवानंतर हार्दिक पांड्याने सामना हरण्याचे मोठे कारण सांगितले आहे.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने फलंदाजांवर क्लास लावला अन् म्हणाला की, आज विकेट चांगली होती, पहिल्या सामन्यासारखी नव्हती, पण आमच्या फलंदाजांनी खराब शॉट्स खेळले आणि विकेट गमावल्या. शार्दुलने शानदार गोलंदाजी केली आणि त्याने आमच्या आशा जिवंत ठेवल्या. निराश झालो, पण बरेच काही शिकायला मिळाले. किशनने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ते भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचे आहे.

एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीबाबत बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला, 'मी वनडे विश्वचषकाची तयारी करत आहे, त्यामुळे आणखी काही षटके करत आहे. हळूहळू मी पूर्ण बॉलिंग फिटनेसकडे वाटचाल करत आहे. यावेळी मी ससा नसून कासव झालो आहे. मालिका 1-1 1 अशी बरोबरीत राहिली असून आता शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे. पुढचा सामना चाहत्यांसाठी तसेच खेळाडूंसाठी रोमांचक असेल.

सामन्या बद्दल बोलायचं झालं तर, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर सहा गडी राखून विजय मिळवला. यासह कॅरेबियन संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 40.5 षटकात 181 धावा केल्या. भारताकडून सर्वाधिक 55 धावा इशान किशनच्या बॅटतुन आल्या. त्याचवेळी वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्ड आणि गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

वेस्ट इंडिजने 182 धावांचे लक्ष्य 36.4 षटकांत चार गडी गमावून पूर्ण केले. शाई होपने कर्णधारपदाची खेळी खेळली आणि नाबाद 63 धावा केल्या. त्याचवेळी केसी कार्टी 48 धावा करून नाबाद राहिला. भारताकडून शार्दुलने तीन बळी घेतले. या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना मंगळवारी त्रिनिदादमध्ये होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT