joshua da silva mother got emotinal after meeting virat kohli 
क्रीडा

Wi vs Ind : कोहलीला भेटल्यानंतर 'या' खेळाडूची आई लागली रडायला, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक

सकाळ ऑनलाईन टीम

Ind vs Wi 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 438 धावा केल्या. यादरम्यान टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सर्वात मोठी खेळी खेळली. या सामन्यात त्याने आपले 76 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.

विराट कोहलीसाठी हा क्षण खूप खास होता. त्याने आपल्या 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावले. तसेच अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने पुन्हा एकदा आपल्या खेळीने चाहत्यांची मने जिंकली. सामना संपल्यानंतर त्याला भेटल्यानंतर एका खेळाडूची आई रडू लागली. विराट कोहलीला पाहण्यासाठीच ती स्टेडियममध्ये आली होती.

विराट कोहलीने 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 121 धावा केल्या. सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजच्या यष्टीरक्षकाने विराट कोहलीला सांगितले होते की, त्याने या सामन्यात शतक झळकावे अशी माझी इच्छा आहे. त्याची आई फक्त विराट कोहलीला पाहण्यासाठीच स्टेडियममध्ये आली आहे.

विराट कोहलीला पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आलेल्या जोशुआ दा सिल्वाच्या आईने आपल्या मुलाला आधीच सांगितले होते की, ती फक्त विराट कोहलीसाठीच स्टेडियममध्ये येत आहे. आता त्याचे आणखी एक स्वप्न पूर्ण झाले आहे. सामना संपल्यानंतर जोशुआ दा सिल्वाच्या आईने विराट कोहलीची भेट घेतली आणि भेटल्यानंतर ती खूप भावूक झाली. विरोधी संघातील खेळाडू असोत किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य, सगळेच विराट कोहलीचे चाहते आहेत.

विराट कोहलीला भेटण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचलेल्या जोशुआ दा सिल्वाच्या आईने त्याला मिठी मारली आणि त्याच्या शानदार फलंदाजीसाठी त्याचे अभिनंदन केले. विराट कोहलीला भेटल्यानंतर त्याच्या आईने सांगितले की, ती आणि तिचा मुलगा जोशुआ विराट कोहलीचे मोठे चाहते आहेत. तो त्याच्यासाठी खूप मोठा क्षण होता. विराट आपल्या देशात क्रिकेट खेळतोय ही खूप मोठी गोष्ट आहे, असेही त्याच्या आईने सांगितले. याशिवाय बीसीसीआयने आपल्या सोशल मीडियावर विराट कोहलीबाबत एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चाहते विराट कोहलीच्या फलंदाजीचे कौतुक करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT