Yashasvi Jaiswal T20I Fifty Record 
क्रीडा

Yashasvi Jaiswal T20I Fifty Record : यशस्वीने रचला इतिहास! कर्णधाराचा 14 वर्ष जुना विक्रम केला उद्ध्वस्त

Kiran Mahanavar

Yashasvi Jaiswal T20I Fifty Record : भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात स्वस्तात विकेट गमावली, पण पुढच्याच सामन्यात त्याने धुमाकूळ घातला. यशस्वीने शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात 51 चेंडूत नाबाद 84 धावांची तुफानी खेळी केली. त्याने 11 चौकार आणि 3 षटकार मारले.

यशस्वीने शुभमन गिल (77) सोबत पहिल्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली. भारताने 179 धावांचे लक्ष्य अवघ्या 17 षटकांत पूर्ण केले. भारतीय संघाने 9 विकेटने विजय नोंदवत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली.

यशस्वीने 33 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने फिफ्टी टाकताच मोठा इतिहास रचला आणि 'हिटमॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माचा 14 वर्ष जुना रेकॉर्ड उद्ध्वस्त केला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा यशस्वी हा सर्वात तरुण भारतीय सलामीवीर ठरला आहे.

यशस्वीने वयाच्या 21 वर्षे 227 दिवसांत ही कामगिरी केली. तर, रोहितने 22 वर्षे 41 दिवसांत ही कामगिरी केली. त्याने 2009 साली इंग्लंडविरुद्ध अर्धशतक ठोकले होते. त्याच्यापाठोपाठ इशान किशनने 22 वर्षे 41 दिवसांत हा पराक्रम केला. इशानने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावले होते.

मात्र, भारतासाठी एकूण टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात तरुण अर्धशतक करण्याचा विक्रम अजूनही रोहितच्या नावावर आहे. रोहितने 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 20 वर्षे 143 दिवसांचा असताना नाबाद 50 धावा केल्या होत्या. या यादीत मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

तिलक वर्मानी 20 वर्ष 271 दिवसात पन्नास धावा केल्या. नुकतेच त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हे अर्धशतक केले.वर्माने 41 चेंडूंचा सामना केल्यानंतर 51 धावा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर ऋषभ पंत (21 वर्षे 38 दिवस) आणि चौथ्या क्रमांकावर यशस्वी (21 वर्षे 227 दिवस) आहे.

टी-20 मध्ये अर्धशतक करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू

  • 20 वर्षे 143 दिवस, रोहित शर्मा (नाबाद 50 वि. दक्षिण आफ्रिका 2007)

  • 20 वर्षे 271 दिवस टिळक वर्मा (51 विरुद्ध वेस्ट इंडीज 2023)

  • 21 वर्षे 38 दिवस, ऋषभ पंत (58 वि. वेस्ट इंडिज 2018)

  • 21 वर्षे 227 दिवस यशस्वी जैस्वाल (84 नाबाद वि. वेस्ट इंडिज 2023)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT