India vs West indies ODI Brian Lara  sakal
क्रीडा

VIDEO: टीम इंडियाच्या खेळाडूंना भेटण्यासाठी दिग्गज ब्रायन लाराला ड्रेसिंग रुममध्ये

ड्रेसिंग रूममध्ये शिखर धवनने दिग्गज ब्रायन लाराला मारली मिठी

Kiran Mahanavar

India vs West indies ODI Brian Lara : टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे, जिथे मालिकेतील पहिल्या वनडेत विजयाने सुरुवात केली आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 3 धावांनी पराभव केला.

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. विजयानंतर सर्व खेळाडू उत्साहित आणि आनंदी दिसले. वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लाराने त्यांचा आनंद अजून वाढवला हा दिग्गज अचानक टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये आला.

टीम इंडियाने शुक्रवारी झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 308 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 305 धावाच करू शकला. भारताच्या विजयानंतर माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लाराने ड्रेसिंग रूममध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंची भेट घेतली. यादरम्यान शिखर धवन आणि श्रेयस अय्यर खास संवाद साधताना दिसले. टीम इंडियाच्या खेळाडूंपूर्वी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही लाराची भेट घेतली. बीसीसीआयने त्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे.

कर्णधार शिखर धवनचे या सामन्यात तीन धावांनी शतक हुकले. त्याने 99 चेंडूत 97 धावांची खेळी खेळली. यादरम्यान शिखरने 10 चौकार आणि तीन षटकार मारले. धवन आणि शुभमन गिलच्या 64 आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 50 षटकांत 7 गडी गमावून 308 धावा केल्या. प्रत्युत्तरात विंडीजचा संघ 6 बाद 305 धावाच करू शकला आणि 3 धावांनी सामना गमावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT