Kavya Maran And Nicholas Pooran Sakal News
क्रीडा

IND vs WI : काव्याची चॉईस हिट है भाई; पूरनची बल्ले बल्ले!

सुशांत जाधव

India vs West Indies, 1st T20I : टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर ब्रँडन किंग पहिल्याच षटकात तंबूत परतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या निकोलस पूरन याने मेयर्सच्या साथीनं 47 धावांची महत्त्वपूर्ण भागीगदारी करुन संघाचा डाव सावरला. मेयर्स 31 धावा करुन परतल्यानंतर एका बाजूनं विकेट पडत असताना निकोलस पूरन याने अर्धशतकी खेळी केली.

वेस्ट इंडीज संघाचा उप कर्णधार निकोलस पूरन (Nicholas Pooran) याने 43 चेंडूत 61 धावा कुटल्या. या खेळीत त्याने 4 खणखणीत चौकारांसह 5 गगनचुंबी षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले. त्याची ही खेळी कॅरेबियन संघा इतकीच सनरायझर्स हैदराबाद संघासाठी आनंद देणारी आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात सनरायर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन हिने निकोलस पूरनवर मोठा डाव खेळला होता. 10.75 कोटी मोजून काव्या मारन हिने कॅरेबियनच्या या हिरोला आपल्या संघात सामील करुन घेतलं आहे. ही चॉईस हिट आहे याची झलकच ईडन गार्डन्सच्या मैदानातील त्याच्या खेळीत पाहायला मिळाली.

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) 15 व्या हंगामासाठी संघ बाधणीसाठीची 2 दिवसीय मेगा ऑक्शन प्रक्रिया नुकतीच पार पडली. बंगळुरुमध्ये झालेल्या IPL Mega Auction मध्ये वेस्ट इंडीज (West Indies) चा विकेट कीपर आणि फलंदाज निकोलस पूरन (Nicholas Pooran) याला संघात घेण्यासाठी कोलकाता नाइट राइडर्स (Kolkata Knight Riders) चा मालक शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) आणि हैदराबाद संघाची (Sunrisers Hyderabad) सह मालकीण काव्या मारन (Kavya Maran) यांच्यात चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली होती. काव्या मारन यांनी ही बाजी जिंकली होती. निकोलस पूरनसाठी त्यांनी मूळ किंमतीच्या दहा पट रक्कम मोजली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates: भारत पाक क्रिकेट सामन्याला विरोध शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निदर्शने

Leopard Terror: 'आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागात बिबट्याचा सलग तीन दिवसांचा वावर': परिसरात भीतीचे वातावरण

Solapur Rain update: 'साेलापूर शहरातील रस्त्यावरुन वाहू लागल्या नद्या'; शनिवारी शहरात ३२.६ मिमी पाऊस; तीन दिवसांपासून ड्रेनेज तुंबलेलेच

Northeast India Earthquake: ईशान्य भारत भूकंपाने हादरला, बंगालपासून भूतानपर्यंतही जाणवले धक्के

IND vs AUS, ODI: स्मृती मानधनासह दोघींची अर्धशतकं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' पराक्रम

SCROLL FOR NEXT