India vs west indies t20 Series sakal
क्रीडा

व्वा रोहित...मानलं! पदार्पण करणाऱ्या आवेश खानच्या हाती दिली ट्रॉफी

मालिका विजयानंतर रोहित शर्माने ट्रॉफी नवख्या आणि पदार्पण करणाऱ्या आवेश खानच्या हाती सोपवली.

दत्ता लवांडे

भारताने वेस्ट इंडिज संघाला १७ धावांनी पराभूत करून टी २० मालिकेत व्हाइट वॉश दिला. भारतीय संघाने वेस्ट इंडिजला संपूर्ण मालिकेत क्लिन स्वीप दिली. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची दिमाखदार कामगिरी जितकी लक्षवेधी आहे तितकाच अविस्मरणीय क्षण मालिका विजयानंतर बघायला मिळाला. मालिका विजयानंतर रोहित शर्माने ट्रॉफी नवख्या आणि पदार्पण करणाऱ्या आवेश खानच्या हाती सोपवली. या फोटोची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.

वेस्ट इंडिज आणि भारतादरम्यान सुरु असणाऱ्या टी२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज भारताने जिंकला. त्याबरोबर भारताने एकदिवसीय मालिकेसह टी२० मालिकेतही इंडिजच्या संघाला व्हाईट वॉश दिलाय. दरम्यान ट्रॉफी स्वीकारताना रोहीत शर्माने ती पदार्पण करणाऱ्या आवेश खानच्या हातात दिल्याने त्याची चर्चा होत आहे.

या सामन्यात आवेश खान याने ४ ओव्हर टाकल्या आहेत आणि ४२ रन दिलेले आहेत. पण पदार्पणाचा सामना असल्याचा उत्साह त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. भारताचे पुढील सामने हे श्रीलंकेसोबत असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: आठव्या वेतन आयोगात पुन्हा DA वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय होणार परिणाम?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा इशारा |

अजय देवगनला भेटलो नाही, पण... 'दृश्यम ३' पाहून पहिल्या भागातच मेलेला सॅम म्हणतो- मी सिनेमात जिवंत असतो तर...

IPL 2027 Cricket News: दिल्ली कॅपिटल्सने नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली! 'दादा' कर्णधाराच्या Video ने प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवली

Marathi News Live Updates: काढणीआधीच चार एकर ऊस जळून खाक; विद्युत तारांमधून ठिणगी पडल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT