ind vs wi series 2023 Arshdeep Singh  
क्रीडा

Team India : टीम इंडियातुन वगळल्यानंतर अर्शदीपचे तांडव, इंग्लंडमध्ये काढला राग; BCCI ला दिले चोखउत्तर

अर्शदीप सिंगला कसोटी आणि एकदिवसीय संघात स्थान मिळालेले नाही पण...

Kiran Mahanavar

Arshdeep Singh : टीम इंडियाला पुढील महिन्यात जुलैमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचे आहे. ज्यासाठी संघाची घोषणा झाली आहे आणि स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला कसोटी आणि एकदिवसीय संघात स्थान मिळालेले नाही. अर्शदीप सिंग सध्या इंग्लंडमध्ये असून तो केंट संघाकडून काउंटी क्रिकेट खेळत आहे.

अर्शदीप सिंगने आयपीएल 2023 मध्येही शानदार कामगिरी केली होती. त्याने 17 विकेट घेतल्या होत्या. कौंटी क्रिकेटमधील त्याच्या घातक गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अर्शदीप सिंगने या महिन्यात इंग्लंडमधील केंटकडून खेळून काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. टीम इंडियातुन वगळल्यानंतर अर्शदीपचा इंग्लंडमध्ये तांडव पाहिला मिळाला. अर्शदीप सिंगने 11 जूनपासून सुरू झालेल्या सामन्यात सरे विरुद्ध खेळताना 2 डावात 4 विकेट घेतल्या.

25 जूनपासून अर्शदीप सिंग कौंटी क्रिकेटमध्ये आपला दुसरा सामना खेळत आहे. नॉर्थम्प्टनशायरविरुद्ध खेळल्या जात असलेल्या या सामन्यात त्याने शानदार गोलंदाजी केली आहे. त्याच्या घातक गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अर्शदीप सिंगची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने 2022 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले. त्याने भारतासाठी आतापर्यंत एकूण 26 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 17.78 च्या सरासरीने 41 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने टीम इंडियासाठी 3 वनडे खेळले आहेत, मात्र त्याला आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये यश मिळालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Passes Away: दिग्गज गायिका आशा भोसले यांचं निधन! भारतीय संगीत क्षेत्रातील एक अजरामर आवाज हरपला

ASHA BHOSLE PASSES AWAY: बालपणीचा गोड क्षण, आशा भोसले आणि लता मंगेशकरांचा यांचा जुने फोटो Viral

Hormuz Strait: करार नाही, तणाव कायम… तरी होर्मुझमधून GOOD NEWS! जे घडलं ते जगाला थक्क करून गेलं! १६ जहाजांची धडाकेबाज एंट्री

Asha Bhosale: वयाच्या १० व्या वर्षी करिअरची सुरूवात ते २० भाषांत १२००० गाणी, गिनीज बुक मध्ये नोंद; 'असा' आहे आशाताईंचा संर्घषमयी जीवनप्रवास

Induction Safety Tips : इंडक्शन स्टोव्हजवळ अजिबात ठेऊ नका 'या' 5 वस्तू; नाहीतर लगेच होतील खराब, इंडक्शनही जळेल

SCROLL FOR NEXT