IND v WI Women's World Cup  sakal
क्रीडा

महिला विश्वचषकात टीम इंडियाच्या विजयाची 5 मोठी कारणे

न्यूझीलंडविरुद्धचा पराभव हा मिताली राजच्या नेतृत्वाखालील संघाला मोठा धक्का होता

Kiran Mahanavar

IND v WI Women's World Cup : भारतीय संघाने आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2022 मध्ये आपला दुसरा सामना जिंकला आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिज संघाचा पराभव करत स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला. न्यूझीलंडविरुद्धचा पराभव हा मिताली राजच्या नेतृत्वाखालील संघाला मोठा धक्का होता, पण कॅरेबियन संघाविरुद्ध भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. भारताने वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाचा 155 धावांनी पराभव केला. या सामन्याशी संबंधित पाच मोठ्या गोष्टी ज्यांच्यामुळे भारताला हा विजय मिळाला.

भारतासाठी वेगवान सुरुवात

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मिताली राजचे मोठे स्कोअर करण्याचे इरादे स्पष्ट दिसून येत होते. त्यामुळे स्मृती मानधना आणि यस्तिका भाटिया या सलामीवीरांनी झटपट सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 6.3 षटकांत 49 धावा जोडल्या. यास्तिकाने 21 चेंडूत 31 धावा केल्या. भारताने 50 षटकात 8 बाद 317 धावा केल्या होत्या.

मानधना-हरमन भागीदारी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात चांगली सुरुवात करूनही भारताच्या तीन विकेट ७८ धावांत पडल्या. त्यानंतर सलामीवीर स्मृती मंधानाने उपकर्णधार हरमनप्रीत कौरसह डाव सावरायला सुरवात केली. महिला विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी अशी भागीदारी केली, जी महिला संघ कधीही करू शकला नव्हता. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 184 धावांची विक्रमी भागीदारी केली. स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर या दोघांनीही शतके झळकावली.

वेस्ट इंडिजची वेगवान सुरुवात थांबली

318 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला डिआंड्रा डॉटिन आणि हीली मॅथ्यूजने झटपट सुरुवात करून दिली. दोघांनी 12 षटकात 100 धावा केल्या होत्या. मात्र, स्नेह राणाने ही जोडी फोडली आणि त्यानंतर भारताने पुनरागमन केले. मग भारताने वेस्ट इंडिजचा डाव 40.3 षटकांत 162 धावांत गुंडाळला.

उत्कृष्ट क्षेत्ररक्षण

महिला विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाची क्षेत्ररक्षणाची पातळी आतापर्यंत चांगली असली तरी टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या प्रचंड धावसंख्येचा बचाव करताना उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. क्षेत्ररक्षणाच्या पातळीवर बरीच सुधारणा दिसून आली आहे. तर दुसरी कडे वेस्ट इंडिजने अनेक झेल सोडले आणि धावबादच्या संधी गमावल्या.

राणा आणि गायकवाड यांचे स्पेल

कॅरेबियन संघाने 12 षटकात 100 धावा केल्याने 317 धावांचा बचाव करताना टीम इंडिया अडचणीत आली होती. त्यानंतर स्नेह राणाला कर्णधार मिताली राजने झेलबाद केल्या नंतर डिआंड्रा डॉटिन हा हे बाद केले. तर मेघना सिंगने पुढील दोन विकेट घेतल्या, जे पहिल्या काही षटकांमध्ये महागडे ठरले. त्याचवेळी राजेश्वरी गायकवाडने पुन्हा अनुभवाच्या जोरावर विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT