pune sakal
क्रीडा

स्वातंत्र्यदिन विशेष : मुलांना द्या खेळाचा अधिकार!

जगभरातील भारतीयांकरता आजचा दिवस खूप मोलाचा आहे, कारण आपण सगळे ७५ वा स्वतंत्रता दिन साजरा करत आहोत.

सचिन तेंडुलकर

जगभरातील भारतीयांकरता आजचा दिवस खूप मोलाचा आहे, कारण आपण सगळे ७५ वा स्वतंत्रता दिन साजरा करत आहोत. हीच वेळ आहे स्वातंत्र्याबद्दल बोलायची आणि त्याचे मोल काय आहे सांगण्याची. गेली दोन वर्षे संपूर्ण मानवजातीलाच एक जोरदार धक्का बसला. ‘कोविड -१९’ने आपल्या सगळ्यांना घरात बसावे लागले. पूर्वी हिंडण्या-फिरण्याच्या, मोकळा श्वास घेण्याच्या साध्या गोष्टींना आपण किती गृहीत धरत होतो. म्हणूनच कदाचित मैदानावर खेळ चालू झाल्यावर आणि टोकियो ऑलिंपिक स्पर्धा झाल्याने आपल्याला मोठा दिलासा मिळाला. टीव्हीवर का होईना, खेळाडूंना खेळताना बघून आपले कौशल्य सादर करताना बघून खूप छान वाटले.

खेळ खेळणारा देश व्हावा! बघा ना? काय गंमत आहे, एखादी गोष्ट होत नाही तेव्हाच आपल्याला त्याचे मोल कळते! आपल्या प्रकृतीला आपण किती गृहीत धरतो. सांगताना दु:ख होते, की भारत हा तरुण देश आहे, मात्र तंदुरुस्त देश नाहीये. त्याचे प्रतिबिंब भारतात खेळ संस्कृती अद्याप रुजली नसल्यानेही दिसते. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत खेळणाऱ्या आपल्या खेळाडूंचा खेळ बघायला आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला अनेक भारतीय पहाटे उठून टीव्ही बघत होते. पण यातील किती जण खेळाडूंची चांगली कामगिरी बघून कोणता ना कोणता खेळ स्वत: खेळू लागले? भारत एक खेळप्रीय देश आहे त्याचे रूपांतर भारत एक खेळ खेळणारा देश असे व्हायला हवे.

आपल्या देशातील लहान मुलांकडे काय नजरेने आपण बघतो, या वरून देश भविष्यात काय करणार आहे याच अंदाज लावला जातो. कोरोना महामारी सुरू झाल्यावर शाळा बंद झाल्या. सधन घरांतील काही मुलांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण चालू ठेवता आले, पण गरीब घरातील मुलांचे काय हा प्रश्न अनुत्तरित राहतो. दुर्दैवाने, अजून आपण मुलांच्या खेळाकडे गांभीर्याने बघत नाही, कारण अजून तो शालेय शिक्षणाचा भाग समजला जात नाही. खेळ म्हणजे फक्त व्यायामाचा भाग नसून, ते व्यक्तिमत्त्व घडवायला मदत करते, नेतृत्व गुणांना वाव देते, एकमेकांना साथ द्यायला शिकवते, हार-जीत पचवायला शिकवते. मला वाटते, या गुणांमधून तर माणूस घडत जातो ना?

महामारीचा किती वाईट परिणाम मुलांच्या मन:स्वास्थ्यावर झाला आहे, हे विविध शोध निबंधांमधून समोर येत आहे. मुलांच्या मनावर होणाऱ्या परिणामांकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही, तसेच आपण खेळ मुलांच्या मनावर कसा सकारात्मक परिणाम करतो हे सुद्धा विसरू शकत नाही. टप्प्याटप्प्याने शाळा चालू होतील, तेव्हा अभ्यासाचे गमावलेले तास भरून काढायला खेळाचे, व्यायामाचे तास कमी केले गेले जाण्याची शक्यता मला भेडसावत आहे. आपण खेळाच्या महत्त्वाला गांभीर्याने घेण्याची नितांत गरज आहे. खेळाचा-व्यायामाचा तास आठवड्यातून काही वेळा घेण्याऐवजी रोज घ्यायला हवा, असे मला वाटते. खेळाचा खूप मोठा सकारात्मक परिणाम मुलांच्या अभ्यासावर होणार आहे.

खेळ अभ्यासाचा भाग व्हावा

भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत केलेल्या पदक जिंकणाऱ्या या कामगिरीचा खूपच जबरदस्त परिणाम मुलांच्या मनावर होणार आहे आणि लहान मुला- मुलींना आपल्या आवडीचा खेळ निवडून त्यात झोकून देऊन सराव करायला सुरुवात होईल. पण मला खरा आनंद तेव्हाच होईल, जेव्हा खेळाचा समावेश अभ्यासाचा भाग म्हणून केला जाईल. मला सांगताना आनंद होतोय, की विविध देशातील पदक विजेत्या खेळाडूंची वैयक्तिक जीवनातही वेगवेगळ्या शाखेत करिअर आहेत. खेळाडूंच्या कामगिरीतून प्रेरणा घेत भारतातील मुले-मुली खेळू लागतील, तेव्हा सगळे पदक विजेते खेळाडू झाले नाहीत, तरी चांगले डॉक्टर्स, इंजिनिअर्स, चांगले वकील आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चांगले माणूस होतील.

शाळा चालू करण्याचा विचार करत असताना ‘कोविड -१९’चा धोका संपूर्ण सरला नसल्याचे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवे. दुर्दैवाने, जर परत संकट आले आणि शाळा बंद झाल्या, तर ऑनलाइन अभ्यास चालू राहील तसेच आपली मुले शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त कशी राहतील याकडेही लक्ष द्यायला हवे. प्रत्येक दिवसानंतर आपला मोबाईल फोनवरचा भर वाढत असताना आपण ‘इम्मोबाईल’ होणार नाही ना, हे बघायला हवे. भावी पिढी करता ‘खेळाचे स्वातंत्र्य’ तितकेच महत्त्वाचे आहे, जितके ‘शिक्षणाचा अधिकार’. त्याचबरोबर ज्या मुलांना ऑनलाइन शिक्षण मिळत नाहीये त्यांच्याबाबत संवेदना ठेऊयात.

भारताचा ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपण सगळे शपथ घेऊयात, की देशाचे रूपांतर ‘खेळप्रेमी’ देशातून ‘खेळ खेळणारा’ देश असे करूयात. देशाचे आणि देशाच्या नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.

जय हिंद !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT