Asian Games 2023 esakal
क्रीडा

Asian Games 2023 : शुटिंगमध्ये अजून एक पदक; ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने जिंकले रौप्य

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 : भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने पुरूष 50 मीटर रायफल 3 पोजिशन प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे. ऐश्वर्यने आतापर्यंत एशियन गेम्समध्ये चार पदके पटकावली आहेत. त्याने 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कास्य जिंकले आहे. भारताने आतापर्यंत 32 पदके जिंकली आहेत. त्यात 8 सुवर्ण, 12 रौप्य आणि 12 कांंस्य पदके जिंकली आहेत.

एशियन गेम्स 2023 मध्ये 50 मीटर एअर रायफल 3 पोजिशन शुटिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसळे आघाडीवर होता त्याने 35 शॉट्सपर्यंत गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. मात्र त्यानंतर त्याची घसण होऊ लागली अन् ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर हळूहळू गुणतालिकेत वरती सरकत होता.

अखेर 43 व्या शॉट्सनंतर ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर 439.7 गुण घेत दुसरे स्थान पटकावले अन् रौप्य पदक जिंकले. कोल्हापूरचा स्वप्निल कुसळे 438.9 गुण घेत चौथ्या स्थानावर राहिला. त्याचे कांस्य पदक अवघ्या 0.1 गुणाने कांस्य पदक हुकले.

भारतीय शूटर्सनी आज दोन सुवर्ण पदके जिंकली होती. पलक आणि इशा सिंह यांनी 10 मीटर एअर पिस्टल वैयक्तिक प्रकारात सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले होते. त्यानंतर 50 मीटर एअर रायफल 3 पोजिशन सांघिक प्रकारात ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, स्वप्निल कुसळे, अखिल शेओरान यांनी सुवर्ण वेध घेतला होता. इशा, पलक आणि दिव्या यांनी दिवसाची सुरूवात रौप्य पदकाने केली होती. त्यांनी महिला 10 मीटर एअर पिस्टल सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England Coach : इंग्लंड कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर, अँडी फ्लॉवर RCB ची साथ सोडणार? मोठी अपडेट्स आली समोर

Satana News : 'एक रुपयात पीक विमा योजना' तात्काळ पूर्ववत सुरू करा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे संजय चव्हाण यांची आग्रही मागणी

Latest Marathi News Live Update : मी ठाकरेंना अमरावतीला येऊन एकत्र हनुमान चालीसा पठण करण्याचे निमंत्रण देते - नवनीत राणा

'प्रायव्हेट जेट' ऐकलं असेल पण संपूर्ण रेल्वे ट्रेन बुक करता येते! भारतीय रेल्वेची खास 'FTR' सुविधा...

Kasari Sonarmala Road: कासारीतील सोनारमळा रस्ता वर्षानुवर्षे दुरावस्थेत; ग्रामस्थांचा ‘रस्ता देता का’ असा आक्रोश

SCROLL FOR NEXT