India all out on 165 in 1st test against New Zealand  
क्रीडा

INDvsNZ : जेमीसन-साउदीने उडवली भारताची दाणादाण

सुनंदन लेले

वेलिंग्टन : अनुभवी टीम साउदी आणि पदार्पण करणार्‍या कायल जेमीसनने प्रत्येकी चार फलंदाजांना बाद करून भारताच्या पहिल्या डावाची दाणादाण उडवली. भारताचा पहिला डाव 165 धावांमधे गुंडाळण्यात न्युझिलंड संघाला आलेले यश सामन्याचे भवितव्य ठरवणारे आहे. भारताकडून सर्वाधिक धावा अजिंक्य रहाणेच्या त्याही फक्त 46 होत्या याचा विचार करता दर्जेदार स्वींग गोलंदाजी समोर भारतीय फलंदाजांचे झालेले हाल लक्षात येऊ शकतात.


दुसर्‍या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाल्यावर अहो आश्चर्यम म्हणजे केन विल्यमसनने डावखुर्‍या फिरकी गोलंदाज एजाज पटेलला संधी दिली. रिषभ पंतने ती योजना बघून जिभल्या चाटल्या आणि एजाज पटेलला उत्तुंग षटकार मारला. लगेच केन विल्यमसनने चूक सुधारून वेगवान गोलंदाजांना मारा करायला बोलावले. भारताला पहिला धक्का गोलंदाजांनी नव्हे तर धावा पळताना खराब सामंजस्याने दिला. अजिंक्य रहाणेने चेंडू मोकळ्या जागेत मारून सहजी एक धाव असल्याचे सांगत पळायला सुरुवात केली. रिषभ पंतने चार पावले पुढे येऊन मग नकार देण्याची चूक केली. परिणामी अजिंक्य रहाणे पळत राहिला आणि रिषभ पंत धावबाद झाला.

मुख्य फलंदाजांची जोडी फुटल्याचा धागा पकडत मग टीम साउदीने प्रथम रहाणेला आणि पुढच्याच चेंडूवर अश्विनला बाद करून भारतीय फलंदाजीला हादरे दिले. महंमद शमीने हाणामारी करून 20 धावा केल्याने भारताला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. छाप पाडणार्‍या कायल जेमीसनने चिवट फलंदाजी करण्यात पटाईत असलेल्या ईशांत शर्माला बाद केले. समोरून टीम साउदीला मोठा फटका मारताना शमी बाद झाला आणि भारताचा पहिला डाव 165 धावांवर आटोपला. साउदीने चार फलंदाज 49 तर जेमीसनने चार फलंदाज 39 धावांत तंबूत पाठवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

Women Farmers Lead: भिवधानोरा गावातील शेतकरी महिलांची जलसंधारण, सेंद्रिय शेती व सामूहिक खरेदीत आदर्श कामगिरी; पाणी फाउंडेशन स्पर्धेत उठून दिसले योगदान

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

School Flooding: पहिल्याच पावसात अगरकानडगाव जि.प. शाळा जलमय; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी शिरसाट यांची पाहणी

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

SCROLL FOR NEXT