T20 World Cup India Vs Pakistan marathi news sakal
क्रीडा

T20 World Cup : 'किती पैशांची गरज आहे ते सांगा....' IND vs PAK एकाच ग्रुपमध्ये पाहून 'या' क्रिकेट बोर्डाने ICC ला डिवचलं

Kiran Mahanavar

T20 World Cup India Vs Pakistan : यंदा वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी आयसीसीने वेळापत्रक जाहीर केले आहे. दरम्यान, एका देशाच्या क्रिकेट बोर्डाने भारत आणि पाकिस्तानला पुन्हा एकाच गटात ठेवल्याचा गंभीर आरोप केला आहे.

खरं तर, आयसीसी अनेक दिवसांपासून कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानला आयसीसी स्पर्धांमध्ये एकाच गटात ठेवत आहे. यावेळीही असाच प्रकार घडला आहे, हे पाहून आइसलँड क्रिकेट बोर्डाने ICC ला डिवचलं.

2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात पाहून आइसलँड क्रिकेटने ट्विट केले की, "आयसीसीला वर्ल्ड कपसाठी भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात न ठेवण्यासाठी किती पैशांची गरज आहे?"

वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणारा सामना प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने पाहतात. यामुळे आयसीसीने दोन्ही संघांना एकाच गटात ठेवले आहे, जेणेकरून गट टप्प्यात दोघांमध्ये सामना खेळला जाऊ शकतो.

याआधी 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही भारत आणि पाकिस्तानचे संघ एकाच गटात होते. आणि दोघांमध्ये खेळला गेलेला ग्रुप स्टेजचा सामना खूपच रोमांचक झाला होता.

2024 मध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होतील, ज्यांना 'A' ते 'D' चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त आयर्लंड, कॅनडा आणि यूएसए या संघांचा समावेश आहे. या स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार असून भारतीय संघ 5 जूनला आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

त्यानंतर टीम इंडिया ग्रुप स्टेजचा दुसरा सामना 9 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे, जो न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. यानंतर गटात भारताचा सामना अमेरिका आणि कॅनडाशी होणार आहे. टीम इंडिया ग्रुप स्टेजपासूनचे सर्व सामने अमेरिकेत खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Kalyan Crime : ६ महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या २५ वर्षीय लेकीची हत्या, वडिलांवरच संशय; काय घडलं?

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

SCROLL FOR NEXT