Sarabjot singh sakal
क्रीडा

India at Paris olympics 2024 Live : भारतीय नेमबाजाची नशिबाने थट्टा मांडली! समान ५७७ गुण असूनही पदकाच्या शर्यतीतून बाद, कारण...

Paris Olympic 2024 India - पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आतापर्यंत निराशा केली. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल पात्रता फेरीत भारताच्या सरबजोत सिंगला थोडक्यासाठी अपयश पत्करावे लागले.

Swadesh Ghanekar

Paris Olympics 2024 Live India - भारतीय नेमबाज ऑलिम्पिक स्पर्धेतील १२ वर्षांचा दुष्काळ आज संपवतील अशी आशा चाहत्यांना लागली होती. पण, मिश्र गटाच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात पात्रता फेरीत अपयश आले. त्यानंतर १० मीटर एअर पिस्तुल पुरुष गटात सरबजोत सिंगला ( Sarabjot Singh) याच्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि नेमबाजाने सर्वस्व पणाला लावताना तगड्या स्पर्धकांना आव्हान दिले. मात्र, ५७७ असे समान गुण होऊनही त्याला पदकाच्या शर्यतीत जाता आले नाही.

भारताच्या पुरुष व महिला तिरंदाजी संघाने २५ जुलै रोजी झालेल्या पात्रता फेरीत दमदार कामगिरी करून उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवला. पण, शनिवारी रोईंगमध्ये भारताच्या बलराज पनवारची ( Balraj Panwar) थेट पात्रतेची संधी थोडक्यात हुकली आणि त्याला रेपेचेज राऊंडमधून संधी आहे. रमिता आणि अर्जुन बबुता यांनी १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटात पदकाच्या शर्यतीतून १ गुणाच्या फरकाने बाहेर पडावे लागले.

१० मीटर एअर पिस्तुल गटात २२ वर्षीय सरबजोत सिंगने पहिल्या तीन सीरिजमध्ये ९४,९७ व ९६ गुणांची कमाई केली. चौथ्या सीरिजमध्ये त्याने १०० गुण घेताना जबरदस्त पुनरागमन केले. पण, पाचव्या व सहाव्या सीरिजमध्ये त्याला ९३ व ९७ असे गुण घेता आले. त्याची एकूण गुणसंख्या ही ५७७ राहिली आणि त्याने जर्मनीच्या रॉबिन वॉल्टर ( ५७७) याच्यासोबत बरोबरी केली. १० मीटर एअर पिस्तुल पात्रता फेरीतून अव्वल ८ नेमबाजच पदकाच्या शर्यतीत जाणार होते.

आठव्या स्थानासाठी सरबजोत सिंग व रॉबिन वॉल्टर यांच्या ५७७ गुणांसह टाय झाली होती. पण, वॉल्टरने ( १८) सरबजोतपेक्षा ( १७) एक लक्ष्य १० गुणांच्या बरोबर मधोमध भेदले आणि त्या जोरावर त्याने आठव्या क्रमांकासह पदकाच्या शर्यतीत झेप घेतली. सरबजोतला नवव्या क्रमांकावर रहावे लागले.

चीनने उघडले पदकाचे खाते...

१० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटात चीनने सुवर्णपदक जिंकले. त्यांनी फायनलमध्ये दक्षिण कोरियावर १६-१२ असा विजय मिळवला. तत्पूर्वी, कांस्यपदकाच्या लढतीत कझाकस्तानने १७-५ अशा फरकाने जर्मनीला पराभूत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT