India at Paris olympics 2024 Day1 sakal
क्रीडा

India at Paris olympics 2024 Live - मनू भाकरने स्वप्न दाखवले! हॉकी, बॅडमिंटन, टेटेतही चमकले; भारताचा दिवस 'सुपर' राहिला

Paris Olympic 2024 India - पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा पहिला दिवस भारतासाठी संमिश्र राहिला. नेमबाजीत दोन पदकं मिळवण्याची संधी थोडक्यात हुकल्याचे दुःख असताना मनू भाकरने पदकाचे स्वप्न दाखवले. हॉकीचा सामना रोमहर्षक राहिला.

Swadesh Ghanekar

India in Paris Olympic 2024 LIVE Day 1 Round Up - पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भव्यदिव्य उद्घाटन सोहळ्यानंतर आजपासून खऱ्या अर्थाने सुरू झालेल्या स्पर्धेत भारताची सुरुवात काही खास राहिली नाही. पण, २२ वर्षीय नेमबाज मनू भाकरने ( Manu Bhaker) १४० कोटी भारतीयांना पदकाचे स्वप्न दाखवले. तिने १० मीटर एअर पिस्तुल महिला गटाच्या फायनलमध्ये धडक दिली. त्यानंतर बॅडमिंटनच्या कोर्टवर लक्ष्य सेन, सात्विकराज रँकिरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीने जोश 'हाय' केला. टेबल टेनिसमध्ये हरमीत देसाईने विजय मिळवला, तर भारतीय पुरुष हॉकी संघाने पिछाडीवरून मुसंडी मारत न्यूझीलंडला पराभवाची चव चाखवली.

India Round Up Day 1

रोईंग

रोईंगमध्ये बलराज पनवारची थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची संधी थोडक्यात हुकली. पनवारने पुरुष एकल स्कलच्या हिटमध्ये ७ मिनिटे ०७.११ सेकंदची नोंद करताना चौथे स्थान पटकावले. पण, त्याला उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवता आला नाही. इजिप्तचा अब्देलखालेक एलबानिया ( ७:०५.०६) तिसरा आल्याने बलराजची संधी थोडक्यात हुकली. आता त्याला उद्या होणाऱ्या रेपेजेच राऊंडमधून आगेकूच करण्याची आणखी एक संधी आहे.

नेमबाजी -

नेमबाज १२ वर्षांचा ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकाचा दुष्काळ संपवण्याचा निर्धाराने मैदानावर उतरले. पण, १० मीटर एअर रायफल मिश्र गट आणि पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल गटात थोडक्यात भारताचे फायनल हुकले.

१० मीटर एअर पिस्तुल पुरुष गटात सरबजोत सिंगने ( Sarabjot Singh) सर्वस्व पणाला लावताना तगड्या स्पर्धकांना आव्हान दिले. मात्र, ५७७ असे समान गुण होऊनही त्याला पदकाच्या शर्यतीत जाता आले नाही. जर्मनीचा रॉबिन वॉल्टर पुढे गेला.

रमिता आणि अर्जुन बबुता यांनी १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटात ६२८.७ गुण कमावले आणि चौथ्या क्रमांकावरील जर्मनीपेक्षा ( ६२९.७) एका गुणाच्या फरकाने ते मागे राहिले. त्यामुळे ते पदकाच्या शर्यतीत पात्र नाही ठरू शकले.

मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात ५८० गुणांची कमाई करून तिसऱ्या स्थानासह फायनलमध्ये एन्ट्री घेतली. उद्या दुपारी ३.३० वाजता फायनलमध्ये ती ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उतरणार आहे. २० वर्षांनंतर फायनलमध्ये प्रवेश करणारी मनू ही भारताची पहिली महिला नेमबाज ठरली. २००४ मध्ये सुमा शिरूर यांनी १० मीटर एअर रायफलच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता.

बॅडमिंटन

पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीने फ्रान्सच्या लुकास कोर्व्ही व रोनान लबार या जोडीचा २१-१७, २१-१४ असा पराभव केला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने २१-८, २२-२० अशा फरकाने केव्हिन कोर्डोनवर मात केली.

टेबल टेनिस

हरमीत देसाईने पुरुष एकेरीत जॉर्डनच्या झैद यमनावर ११-७, ११-९, ११-५, ११-५ असा सहज विजय मिळवून राऊंड ६४ मध्ये प्रवेश केला.

टेनिस

रोहन बोपन्ना व ए श्रीराम बालाजी यांची पुरुष दुहेरीत गाएल मॉनफिल्स व एड्युआर्ड रॉजर-व्हॅसेलिन या फ्रान्स जोडीविरुद्धचा सामना पावसामुळे उद्यापर्यंत स्थगित केला गेला.

हॉकी

भारतीय पुरुष हॉकी संघाने ब गटातील पहिल्याच सामन्यात बलाढ्य न्यूझीलंडवर थरारक विजय मिळवला. पहिल्या ४ मिनिटांत भारताचे दोन गोल किवी गोलरक्षकाने अडवले. त्यानंतर ८व्या मिनिटाला किवींकडून सॅम लॅन याने गोल केला. भारताला त्यानंतर बरोबरीसाठी २४ व्या मिनिटापर्यंत संघर्ष करावा लागला. मनदीप सिंगने बरोबरी गोल केल्यानंतर ३४ व्या मिनिटाला विवेक सागर प्रसादने भारताला आघाडी मिळवून दिली. पण, ५३व्या मिनिटाला सिमॉन चाईल्डकडून २-२ अशी बरोबरीत मॅच आणली. मात्र, ५९व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने गोल करून भारताचा ३-२ असा विजय पक्का केला.

बॉक्सिंग

बॉक्सिंगमध्ये भारताची २० वर्षीय प्रीती पवारने ५४ किलो वजनी गटात पहिला विजय मिळवला. तिने व्हिएतनामच्या वो थी किम अन्हा हिला ५-० अशा फरकाने पराभूत करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता तिचा पुढील सामना कोलंबियाच्या मार्सेला येनी एरियासविरुद्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT