Manu Bhaker qualifies for 10m pistol final sakal
क्रीडा

India at Paris olympics 2024 Live : कोण आहे मनू भाकर? टोकियोत पिस्तुल बिघडले अन् पदक हुकले, पण पॅरिसमध्ये...

Manu Bhaker Paris Olympic 2024 India - पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत शनिवारी सायंकाळी १४० कोटी भारतीयांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारी बातमी धडकली... २२ वर्षीय नेमबाज मनू भाकरने फायनलमध्ये प्रवेश मिळवला.

Swadesh Ghanekar

India at Paris olympics 2024 Live Update - वय वर्ष २२... वर्ल्ड कप स्पर्धेत ९ सुवर्ण, युवा ऑलिम्पिक स्पर्धेत १, ज्युनियर वर्ल्ड कप स्पर्धेत ४, राष्ट्रकुल स्पर्धेत १ अशी असंख्य सुवर्णपदकं नावावर असलेल्या मनू भाकरचं ( Manu Bhaker) ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न ३ वर्षांपूर्वी टोकियोतच पूर्ण झाले असले, परंतु तिच्या पिस्तुलात बिघाड झाला अन् तिचा फायनलमधील प्रवेश हुकला... पण, २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मनूने ऑलिम्पिक स्वप्नपूर्तीच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील शनिवारचा दिवस तसा भारतीयांसाठी काही खास राहिला नव्हता. रोईंगमध्ये बलराज पनवारची थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची संधी थोडक्यात हुकली. त्याला उद्या रेपेचेज राऊंडमधून पुनरागमन करण्याची संधी आहे. त्यानंतर नेमबाज १२ वर्षांचा ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकाचा दुष्काळ संपवण्याचा निर्धाराने मैदानावर उतरले. पण, १० मीटर एअर रायफल मिश्र गट आणि पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल गटात थोडक्यात भारताचे फायनल हुकले. मात्र, टोकियोत तांत्रिक बिघाडामुळे आलेले अपयश बाजूला ठेवून मनू शुटिंग रेंजमध्ये आली.

आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर भरपूर दिसत होता. तिने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात ५८० गुणांची कमाई करून तिसऱ्या स्थानासह फायनलमध्ये एन्ट्री घेतली. उद्या दुपारी ३.३० वाजता फायनलमध्ये ती ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उतरणार आहे. मनूने आज २७ शॉट्स हे १० गुणांच्या वर्तुळात अचूक साधले. याच गटात भारताच्या रिदीम सांगवानला ( ५७३) १५व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

कोण आहे मनू भाकर?

मनू भाकरने २०१८ च्या ISSF World Cup स्पर्धेत दोन सुवर्ण पदक जिंकून इतिहास घडवला होता. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची सर्वात युवा नेमबाज ठरली होती. २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने १० मीटर एअर पिस्तुल विभागात सुवर्ण जिंकले होते आणि तेही वयाच्या १६व्या वर्षी पदार्पणाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत. आशियाई स्पर्धेतही २५ मीटर पिस्तुल महिला सांघिक गटाचे सुवर्णपदक तिच्या नावावर आहे.

हरयाणाच्या झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावात जाट कुटुंबात १८ फेब्रुवारी २००२ मध्ये मनूचा जन्म झाला. तिचे वडील हे मर्चंट नेवीत मुख्य अभियंतता म्हणून काम करायचे. २०१६ मध्ये मनूने नेमबाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली.

शाळेत प्रथम जेव्हा तिने नेमबाजी केली, तेव्हा तिचा अचूक निशाणा पाहून शिक्षकही अवाक् झाले. त्यानंतर प्रशिक्षण घेऊन तिने स्पर्धेत सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. पण, कमी वयामुळे तिला पिस्तुलासह सार्वजनिक ठिकाणी प्रवास करता येत नव्हता आणि यावर तोडगा म्हणून वडिलांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. राम किशन भाकर सांगतात, नेमबाजी खूप खर्चिक खेळ आहे आणि एक पिस्तुल दोन दोन लाखांची असते. वर्षाला जवळपास १० लाख रुपये मनूच्या खेळासाठी खर्च होतात. नोकरी नसताना मित्र आणि नातेवाईकांकडून हे पैसे उधारीवर घेतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT