हरमनप्रीत सिंग 
क्रीडा

भारतीय हॉकी संघाचा गोलधडाका कायम

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय हॉकी संघाने बेल्जियम दौऱ्यातील धडाका कायम ठेवताना स्पेनचा दुसऱ्या कसोटीत 5-1 असा धुव्वा उडवला. भारताने पहिल्या कसोटीत 6-1 अशी बाजी मारली होती; तर त्यापूर्वी बेल्जियमला पहिल्या कसोटीत 2-1 असे पराजित केले होते.

स्पेनविरुद्धच्या पहिल्या कसोटीप्रमाणेच ऍटरुप येथील दुसऱ्या कसोटीतही भारताचे वर्चस्व होते. स्पेनने पहिला गोल तिसऱ्याच मिनिटास करून भारतास हादरवले खरे; पण दोनच मिनिटांत आकाशदीपने गोल करीत भारतास बरोबरी साधून दिली. त्यानंतर एस. व्ही. सुनील (20 व्या मिनिटास), रमणदीप (35) यांनी प्रत्येकी एक; तर हरमनप्रीत सिंगने (41 आणि 51) दोन गोल करीत भारताचा एकतर्फी विजय निश्‍चित केला.

भारताने पहिल्या लढतीप्रमाणेच आक्रमक खेळ केला; पण पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात सुरुवातीस अपयश आले. त्याचबरोबर दवडलेल्या काही संधी भारतास नक्कीच सलत असतील. स्पेनच्या चिवट युवा खेळाडूंनी भारताचा कस बघताना चांगली प्रतिआक्रमणे केली; पण कृष्णन बी. पाठकने सहकारी बचावपटूंच्या साथीत ती प्रामुख्याने निष्प्रभ ठरवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Challan Recovery: थकबाकी असलेला ट्रॅफिक दंड आता वीज बिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाची सरकारांना महत्त्वाची सूचना

Vastu Tips: धुळीच्या भीतीने घराच्या खिडक्या २४ तास बंद ठेवताय? वास्तूशास्त्रानुसार ओढावू शकतात 'या' ५ मोठ्या अडचणी!

Dharashiv Kirtankar Fight : 'माझी सुपारी का घेतली?'; धाराशिवमध्ये दोन महाराज आपापसात भिडले, थेट हाणामारीनंतर बाल वारकऱ्यांना घेऊन महामार्गावर केलं आंदोलन

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT