Team India
Team India bcci twitter
क्रीडा

शास्त्री गुरुजी म्हणाले, 'बिनधास्त बॉईज'चा अभिमान!

सुशांत जाधव

आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमधील (icc test ranking) वार्षिक मुल्यांकात भारतीय संघाने बाजी मारली. वर्षभरातील कामगिरीच्या आढाव्यानंतर भारतीय संघ 121 गुणासंह टॉपला आहे. मागील दोन वर्षांत टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी केलीय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासह घरच्या मैदानातील दिमाखदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट (WTC) चॅम्पियनशिपची फायनल गाठली होती. न्यूझीलंड विरुद्धच्या फायनलपूर्वी अव्वस्थानी घेतलेली झेप भारतीय संघासाठी नश्चितच फायदेशीर ठरेल. 18 जून रोजी इंग्लंडमधील साउथहॅम्टनच्या मैदाना भारत-न्यूझीलंड फायनल रंगणार आहे. (india become number OnE test team annual update ravi shastri tweeted my boys played tough cricket in tough)

आयसीसीच्या नव्या क्रमवारीनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक खास ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमधून व्यक्त आपल्या भावना व्यक्त केल्यात. रवी शास्त्रींनी लिहिलंय की, ' सध्याच्या भारतीय टीमने एक नंबर होण्यासाठी दृढ संकल्पासह योग्य फोकस केला. भारतीय संघातील खेळांडूच्या प्रामाणिक प्रयत्नाला यश मिळाले आहे. आयसीसीने नियमात बदल केले. त्यानंतरही फोकस कायम ठेवून टीम इंडियातील खेळाडू आपले काम प्रामाणिकपणे करत राहिले. कठीण परिस्थिती त्यांनी चांगला खेळ करुन दाखवला. बिनधास्त खेळणाऱ्या बॉइजचा मला गर्व आहे, अशा शब्दांत रवी शास्त्रींना संघावर स्तुती सुमनांचा वर्षाव केलाय.

टीम इंडियाने घरच्या मैदानात इंग्लंड संघाला चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 असे पराभूत केले होते. इंग्लंड विरुद्धच्या विजयासह संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची दावेदारी पक्की केली. तत्पूर्वी 2020-21 च्या हंगामातील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघाने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने कठीण परिस्थितीत 2-1 असा विजय नोंदवला होता.

india become number OnE test team annual update ravi shastri tweeted my boys played tough cricket in tough

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT