icc test team rankings
icc test team rankings  sakal
क्रीडा

ICC Rankings : टीम इंडियाने रचला 'महारेकॉर्ड'; तिन्ही फॉरमॅटमध्ये बनली नंबर 1 टीम

सकाळ डिजिटल टीम

ICC Test Rankings : टीम इंडिया आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये नंबर-1 टीम बनली आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि १३२ धावांनी पराभव केला.

हेही वाचा : नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

IIC Ranking

आज जाहीर झालेल्या कसोटी संघाची क्रमवारी अपडेट होताच टीम इंडियाने यातही नंबर 1 स्थान पटकावले आहे. रोहित हा जगातील पहिला कर्णधार बनला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 ठरला आहे.

सध्या टी-20 संघाचा कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे तर वनडे आणि कसोटी संघाची कमान रोहित शर्माकडे आहे. वनडे आणि टी-20 क्रमवारीत भारतीय संघ आधीच अव्वल आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ 111 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. अलीकडेच त्यांनी दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर पराभूत केले होते. इंग्लंड 106 गुणांसह तिसऱ्या, न्यूझीलंड 100 गुणांसह चौथ्या, तर दक्षिण आफ्रिका 85 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

2023 मध्ये भारतीय संघाने आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही. प्रथम श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी-२० मालिका जिंकली.

त्यानंतर न्यूझीलंडसोबतची मालिका जिंकली. तसेच नुकत्याच झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना तीन दिवसांत संपवत सामना खिशात टाकला होता.

दोन्ही संघात दुसरी कसोटी १९ फेब्रुवारीपासून दिल्लीत होणार आहे. वनडे आणि टी-२० क्रमवारीत भारतीय संघ आधीच अव्वल आहे.

अश्विनने कसोटी गोलंदाजी गाठले दुसरे स्थान

नागपूर कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या अप्रतिम फिरकी जोडीने सामना गाजवला होता.

ऑस्ट्रोेलियाच्या या कसोटी सामन्यात दोघांनी मिळून एकूण 15 विकेट घेतल्या. त्यानंतर आता अश्विनने 846 रेटिंग गुणांसह ICC च्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत चौथ्या क्रमांकावरून दुसरे स्थान पटकावले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT