भारत ब्रिटन लढतीतील चुरशीचा क्षण
भारत ब्रिटन लढतीतील चुरशीचा क्षण 
क्रीडा

हॉकी अंतिम लढतीपूर्वी भारत-ब्रिटन बरोबरी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारत आणि ब्रिटन यांच्यात सुलतान ऑफ जोहोर कप हॉकी स्पर्धेतील विजेतेपदाची लढत होणार आहे. त्यापूर्वीची प्रतिस्पर्धी संघातील अखेरची साखळी लढत 3-3 बरोबरीत सुटली.

पहिल्या सत्रात वर्चस्व राखूनही गोल करण्यात अपयशी ठरलेल्या भारतास दुसऱ्या सत्रात पाच मिनिटांत दोन गोल स्वीकारावे लागले. पहिल्या तीन सत्रात एकही गोल न केलेल्या भारताने चौथ्या सत्रात नऊ मिनिटांत तीन गोल करीत 3-2 अशी आघाडी घेतली; पण अखेर बरोबरीचा गोल स्वीकारला. भारताकडून शिलानंद लाक्रा, मनदीप मोर आणि शारदा नंद तिवारी यांनी प्रत्येकी एक गोल केला.

दरम्यान, भारत या स्पर्धेची अंतिम फेरी सहाव्यांदा खेळणार आहे; पण त्यांनी यापूर्वी दोनदाच विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर भारतीय संघास गतवर्षीच्या अंतिम फेरीतील पराभवाचे उट्टे काढण्याचीही संधी आहे.

आम्ही अखेरच्या साखळी लढतीत अनेक संधी दवडल्या. ही चूक अंतिम सामन्यात नक्कीच परवडणार नाही. अर्थात सलग दोन सामने खेळताना दुसऱ्या दिवशी आमचा खेळ उंचावतो. अंतिम सामन्यात सातत्य आणि चुका टाळणे हे महत्त्वाचे असेल. ब्रिटनच्या कडव्या आव्हानास सामोरे जाण्यास तयार आहोत.
- बी. जे. कनप्पा, भारतीय मार्गदर्शक

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT