India Defeat Pakistan But 5 Mistakes Should Avoid In Asia Cup 2022  sakal
क्रीडा

IND vs PAK : जिंकलो तरी पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यातील 'या' 5 चुका टाळण्याची आहे गरज

पाकिस्तानला 147 धावात रोखले होते. मात्र भारताची फलंदाजी पाकिस्तानच्या माऱ्यासमोर ढेपाळली. सामन्यात भारतीय संघाने केलेल्या या 5 चुका आगामी सामन्यात टाळणे गरजेचे आहे.

Kiran Mahanavar

IND vs PAK Asia Cup 2022 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेड सामन्यात भारताचाने पाकिस्तानचा 5 विकेट्सनी पराभव केला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत पाकिस्तानला 147 धावात रोखले होते. मात्र भारताची फलंदाजी पाकिस्तानच्या माऱ्यासमोर ढेपाळली. अखेर हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजाने भारताचा डाव सावरत अखेरच्या षटकात सामना जिंकून दिला. जरी भारताने सामना जिंकला असला तरी 148 धावांचे माफक आव्हान पार करण्यासाठी भारताला 19.4 षटके खेळावी लागलीत तसेच पाच फलंदाज खर्ची घालावे लागले. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने केलेल्या या 5 चुका आगामी सामन्यात टाळणे गरजेचे आहे.

जिंकलो तरी पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यातील 'या' 5 चुका टाळण्याची होती गरज

सलामी जोडी - पाकिस्तानचे 148 धावांचे आव्हान पार करताना भारताला चांगल्या सुरूवातीची गरज होती. मात्र डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर केएल राहुल डकवर बोल्ड झाला. त्यानंतर रोहित शर्मा देखील चाचपत खेळत होता. त्याच्या जोडीला आलेला विराट कोहली वेगाने धावा करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला रोहितकडून साथ मिळाली नाही. अखेर भारताचे अर्धशतक धावफलकावर लागले असताना रोहित 12 धावांवर बाद झाला.

कोहलीने धावा केल्या पण... - विराट कोहलीने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात 34 चेंडूत 35 धावा केल्या. त्याने 3 चौकार आणि 1 षटकार देखील मारला. मात्र जुना विराट अजून कुठेतरी मिसिंग होता. तो पहिल्यापासूनच चापडत खेळत होता. अखेर फिरकीपटू मोहम्मद नवाजला षटकार मारण्याच्या नादात तो बाद झाला. भारताचा अव्वल फलंदाज फिरकी गोलंदाजाला बाद होतोय हे पचण्यासरखे नाही.

अखेरच्या षटकात अचूक मारा - भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानविरूद्ध चांगला मारा केला. भुवनेश्वर कुमारने 4 तर हार्दिक पांड्याने 3 विकेट घेतल्या. तर अर्शदीप सिंगने 2 विकेट घेतल्या. पाकिस्तानच्या 19 व्या षटकात 9 बाद 128 धावा झाल्या होत्या. मात्र पाकिस्तानचे तळातील फलंदाज शहानवाज दहानी आणि हारिस रौफ यांनी फटकेबाजी करत पाकिस्तानला 147 धावांपर्यंत पोहचवले. दहानीने 6 चेंडूत 16 तर हारिस रौफने 7 चेंडूत 13 धावांची आक्रमक खेळी केली.

मधल्या फळीत मोठी भागीदारी करण्यात अपयश - भारताचे पहिले तीन फलंदाज केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली संघाचे 53 धावात माघारी गेल्यानंतर भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांना भागीदारी रचण्याची गरज होती. मात्र सूर्यकुमार यादव 18 चेंडूत 18 धावा करून माघारी गेला. त्यामुळे भारतीय फलंदाजीवर दडपण आले.

एकच डावखुरा फलंदाज खेळवणे भोवले - भारताने आजच्या सामन्यात फक्त एक डावखुरा फलंदाज खेळवला. भारताकडे फक्त रविंद्र जडेजाच्या रूपाने एक डावखुरा फलंदाज होता. रोहित शर्माने ऋषभ पंतला आजच्या सामन्यात न खेळवता एक अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडे एक लेग स्पिनर (शादाब खान) आणि एक लेफ्ट आर्म स्पिनर (मोहम्मद नवाज) होता. त्यांच्याविरूद्ध अजून एक डावखुरा फलंदाज जास्त उपयुक्त ठरला असता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Western Railway: मध्यनंतर पश्चिम रेल्वे कोकणवासियांसाठी सरसावली! गणेशोत्सवासाठी सोडणार विशेष गाड्या

Hardik Pandya - Jasmin Walia: हार्दिक - जास्मिन यांच बिनसलं? या घटनेमुळे ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

Pune News : सुनेने दाखल केलेल्या दाव्यातून वगळण्याचा माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह इतरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

जेवताना उचकी लागली, नंतर नाकातून रक्त आलं अन्...; कॉलेजमध्येच विद्यार्थिनीसोबत अघटीत घडलं

DK Shivakumar's Escort Car Overturns: मोठी बातमी! कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट कार महामार्गावर उलटली!

SCROLL FOR NEXT