Ankita Bhakat Dhiraj Bommadevara | Paris Olympic 2024 Archery Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024: तिरंदाजीत पहिल्या मेडलचं स्वप्न स्वप्नच राहिलं! भारताचा ब्राँझसाठीच्या सामन्यात पराभव

Ankita Bhakat-Dhiraj Bommadevara Archery: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीतील मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या धीरज बोम्मादेवरा आणि अंकिता भकत यांना कांस्य पदकाच्या लढतीत पराभवाचा धक्का बसला.

Pranali Kodre

India Archery Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताचे तिरंदाज धीरज बोम्मादेवरा आणि अंकिता भकत ही जोडी इतिहास रचण्यापासून थोडक्यात हुकली. त्यांना शुक्रवारी (२ ऑगस्ट) तिरंदाजीच्या मिश्र गटात कांस्य पदकाच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

कांस्य पदकाच्या सामन्यात धीरज आणि अंकिता यांना अमेरिकेच्या कॅसी कौफहोल्ड आणि ब्रॅडी एलिसन या जोडीने पराभूत केले. त्यांनी भारताला ६-२ अशा फरकाने पराभूत केले.

दरम्यान, भारताला आत्तापर्यंत ऑलिम्पिकमधील तिरंदाजीत कधीच पदक जिंकता आलेलं नव्हतं. आता भारताची पदकाची प्रतिक्षा आणखी लांबली आहे.

थोडक्यात हुकलं पदक...

कांस्य पदकाच्या लढतीत पहिल्या सेटमध्ये अमेरिकेच्या जोडीनं भारताला ३७-३८ अशा पाँइंट्सने मागे टाकले, दुसरा सेटही अमेरिकेनं ३५-३७ अशा फरकाने सहज जिंकला होता. मात्र तिसऱ्या सेटमध्ये धीरज-अंकिताने पुनरागमन करत आशा उंचावल्या होत्या.

त्यांनी तिसरा सेट ३८-३४ फरकाने जिंकला होता. मात्र, चौथ्या सेटमध्ये पुन्हा अमेरिकेची जोडी त्यांच्यावर भारी पडली. अमेरिकेने चौथा सेट भारताविरुद्ध ३७-३५ असा जिंकला. त्यामुळे भारताला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आणि पदकापासून थोडक्यात मुकावे लागले.

शुक्रवारचा दिवस अंकिता-धीरजसाठी ठरलेला विक्रमी

दरम्यान, अंकिता आणि धीरज यांनी शुक्रवारीच उपउपांत्यपूर्व, उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीतील सामनेही खेळले.

दरम्यान, उपउपांत्यपूर्व फेरीत अंकिता आणि धीरज यांनी इंडोनेशियाच्या दिआनंद कोइरुनसिमा आणि अरिफ पेंगस्तू यांना ५-१ गुणांच्या फरकाने पराभूत केले होते. त्यानंतर त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या एलिया कॅनालेस आणि पाब्लो गोन्झालेज अछा या जोडीला ५-३ अशा गुणांच्या फरकाने पराभूत केले होते.

मात्र त्यानंतर बलाढ्य कोरियाच्या जोडीविरुद्ध उपांत्य सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. कोरियाच्या सियुन लिम आणि वूजिन किम या जोडीने भारताला ६-२ अशा फरकाने पराभूत केले होते. त्यामुळे भारताची सुवर्ण किंवा रौप्य पदक जिंकण्याची संधी हुकली. मात्र भारताला कांस्य पदकासाठी खेळण्याची संधी मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT