भारत - थायलंड व्हॉलीबॉल लढत 
क्रीडा

आशियाई युवा व्हॉलीबॉलमध्ये भारत प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय युवा (23 वर्षांखालील) व्हॉलीबॉल संघाने ऐतिहासिक वाटचाल करताना प्रथमच आशियाई स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. चीन आणि न्यूझीलंडला पराजित करीत भारताने गटात अव्वल क्रमांक मिळवला.

भारतीय संघास थायलंडविरुद्ध 2-3 अशी हार पत्करावी लागली होती, तरीही भारताने म्यानमारला सुरू असलेल्या स्पर्धेत आगेकूच केली. भारतीय संघाला थायलंडविरुद्ध 25-15, 23-25, 22-25, 25-19, 13-15 अशी हार पत्करावी लागली. भारत थायलंडविरुद्ध पराजित झाल्याने भारत, चीन आणि थायलंडचे समान गुण झाले. भारताने या लढतीत दोन सेट जिंकल्याने त्यांची सरासरी उंचावली.

आम्ही चीन तसेच न्यूझीलंडविरुद्ध खूपच चांगला खेळ केला होता. चीन वेगवान खेळ करतात, पण आम्ही त्यांना खेळाचा वेग कमी करण्यास भाग पाडले आणि त्या जोरावर बाजी मारली. न्यूझीलंडचा संघ युरोपियन पद्धतीने खेळतो. त्यांच्याविरुद्धही आम्ही सरस ठरलो, असे भारताचे मार्गदर्शक प्रीतम सिंग यांनी सांगितले.

थायंलडची आणि आपली खेळाची शैली सारखीच आहे. आपण बचावात काहीसे कमी पडलो. अर्थात या लढतीतून खूप काही शिकलो आहोत. त्याचा फायदा नक्कीच होईल.
आता भारताची कझाकस्तान आणि जपानविरुद्ध लढत होईल. त्या लढतीनंतर भारतास कोणते मानांकन हे ठरेल आणि त्यानुसार बाद फेरीच्या लढती निश्‍चित होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिए...; भोंदू अशोक खरातच्या चौकशीत धक्कादायक खुलासा! काळ्या कारनाम्याचे गुपित उघड

Satara Politics: ऋतुजा शिंदे यांच्याविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; वाईत प्रतिमेचे दहन, जोडे मारो आंदोलन; जिल्हा परिषद सदस्यत्वाच्या राजीनाम्याची मागणी!

Jalna News: चूल पेटवून भाकरी थापत सरकारचा निषेध; गॅसटंचाईच्या विरोधात वंचितचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Parbhani News: परभणीत वंचित बहुजन आघाडीचे चुलीवर स्वयंपाक आंदोलन, गॅस टंचाईविरोधात तातडीची मागणी

Parbhani News: महापालिकेच्या गाळे भाडेवाढीचा तिढा सुटणार?; न्यायालयाच्या निकालामुळे दिलासा, गाळेधारक अर्ज दाखल करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT