Football ESakal
क्रीडा

Football India: व्हिएतनामविरुद्धचा सामना ड्रॉ; कोच मॅनोलो मार्क्वेझ यांच्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा लांबली

India vs Vietnam Football Match: भारताविरुद्ध व्हिएतनाम सामन्यात तीन वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या फारूक चौधरीने गोल करून सामना बरोबरीचा केला.

सकाळ डिजिटल टीम

India vs Vietnam Football Match: भारतीय पुरुष फुटबॉल संघाचा व्हिएतनामविरुद्ध काल मैत्रीपूर्ण सामना १-१ ने बरोबरीचा झाला आहे. या त्रिदेशीय स्पर्धेतून देशातील अस्थिरतेच्या वातावरणामुळे लेबनॉनने माघार घेतली. त्यामुळे लेबनॉन विरुद्धाचा सामना भारताला रद्द करावा लागला.

व्हिएतनामने गोल करून समन्यात वर्चस्व दाखवले होते. परंतु, या समन्यात तीन वर्षांननंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात पुनरागमन करणाऱ्या फारूक चौधरीने गोल करून सामना बरोबरीचा केला. अन्यथा भारताला सामन्यात पराभवाला सामने जावे लागले असते.

मॅनोलो मार्क्वेझ यांच्या नेतृत्वाखाली भारत तिसरा सामना खेळला. याआधी मार्क्वेझ यांच्या नेतृत्वाखाली भारत इंटरकाँटीनल कपमध्ये मॉरिशेसविरुद्ध पाहिला सामना खेळला आणि हा सामना बरोबरीचा झाला. याच स्पर्धेतील सिरियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताला ०-३ ने पराभव पत्कारावा लागला. कालचा सामना पुन्हा बरोबरीचा झाल्यामुळे मॅनोलो मार्क्वेझ यांना पहिल्या विजयासाठी आणखी वाट पाहवी लागणार आहे.

फिफा क्रमवारीत व्हिएतनाम ११६ व्या स्थानावर आहे. तर, भारत १२६ स्थानावर आहे. आत्तापर्यंत भारत व व्हिएतनाम संघ एकूण ४ वेळा आमने- सामने आले आहेत. २००४ साली झलेल्या एलजी कपमध्ये व्हिएतनामने भारताला पराभूत केले होते.

२०१० मध्ये पुणे इथे झलेल्या व्हिएतनामविरुद्धच्या सामन्यात माजी कर्णधार सुनील छेत्रीने सलग तीन गोल केले होते आणि या सा मन्यात भारत ३-१ ने विजयी झाला होता. व्हिएतनामविरुद्धचा शेवटचा सामना भारताने २०२२ मध्ये खेळाला होता. ज्यामध्ये व्हिएतनामने भारतावर ३-० ने विजय मिळवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

SCROLL FOR NEXT