India Hockey Team | Paris Olympic 2024 Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024: आपली यारी, लय भारी! भारतीय हॉकीपटूंचं ऑलिम्पिक मेडल एकमेकांना घालत अनोखं सेलिब्रेशन, Video एकदा पाहाच

India Hockey Team: भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्यानंतर पोडियमवर अनोखं सेलिब्रेशन करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

Pranali Kodre

India Hockey Team Celebration after Bronze Medal: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत गुरुवार (८ ऑगस्ट) भारतीय हॉकी संघासाठी ऐतिहासिक ठरला. भारतीय हॉकी संघाने गुरुवारी कांस्य पदकाच्या लढतीत स्पेनचा २-१ अशा गोल फरकाने पराभव केला. त्यामुळे भारतीय संघाने कांस्य पदकाला गवसणी घातली.

हे भारतीय संघाचे विक्रमी १३ वे ऑलिम्पिक पदक ठरले, तर भारताने तब्बल ५२ वर्षांनंतर सलग दोन ऑलिम्पिक पदक जिंकले. यापूर्वी भारताने १९४८ ते १९७२ दरम्यान सलग ऑलिम्पिक पदके जिंकली होती. त्यानंतर १९८० साली भारताने ११ वे पदक जिंकले.

यानंतर तब्बल ४० वर्षे भारताला १२ व्या पदकाची वाट पाहावी लागली. २०२१ मध्ये टोकियोत झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्यपदकाची कमाई केली. यानंतर आता पुन्हा भारताने यंदा देखील ऑलिम्पिक पदक आपल्या नावावर केले आहे.

दरम्यान, गुरुवारी रात्री पुरुषांच्या हॉकीमध्ये पदक विजेत्यांचा गौरव करण्यात आला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेदरलँड्सने सुवर्ण आणि जर्मनीने रौप्य पदक पटकावले. यादरम्यान, कांस्य पदक विजेता भारतीय संघ जेव्हा पोडियमवर उभा राहिला, तेव्हा ते एकमेकांचा हात धरून तो उंचावून पोडियमवर आले.

यानंतर जेव्हा त्यांच्या गळात पदक घालण्यात आले. पदक घातल्यानंतर मात्र एक वेगळं, पण सुंदर दृश्य सर्वांना पाहायला मिळालं.

भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने या स्पर्धेनंतर निवृत्ती घेतलेला गोलकीपर पीआर श्रीजेशच्या गळात आपलं पदक घातलं, तर पीआर श्रीजेशनेही त्याच्या गळ्यातलं पदक हरमनप्रीतच्या गळ्यात घातलं. त्यानंतर संघातील अन्य काही खेळाडूंनीही तशीच कृती केली. या अनोख्या सेलिब्रेशनचे सध्या कौतुक होत आहे.

विजय पीआर श्रीजेशला समर्पित

भारतीय संघाने हे कांस्य पदक पीआर श्रीजेशला समर्पित केले आहे. जवळपास दोन दशके श्रीजेशने भारतीय संघासाठी गोलकीपर म्हणून योगदान दिले आहे. त्याने अनेकदा भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. तो भारताच्या हॉकी संघाची अभेद्य भिंत म्हणूनही ओळखला जातो.

पॅरिस ऑलिम्पिकमध्येही त्याने चांगला बचाव केला होता. अगदी अंतिम सामन्यातही त्याने केलेला बचाव भारतासाठी महत्त्वाचा ठरला होता. दरम्यान, त्याने पॅरिस ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वीच घोषणा केली होती की ही स्पर्धा त्याची अखेरची आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल. त्यामुळे आता कांस्य पदकाच्या विजयासह त्याने गोलपोस्टला अलविदा म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

Pune Youth Murder in College Campus : पुण्यात खळबळ!, सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

Sheikh Hasina: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; भारत आता त्यांना परत बांगलादेशात पाठवणार का? जाणून घ्या नियम...

Latest Marathi Breaking News: नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे अमोल मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Kolhapur News: गोकुळच्या लिंगनूर कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ वरुन रंगले कलगीतुरे

SCROLL FOR NEXT