India hockey player Varun Kumar accused of rape booked under POCSO act  Esakal
क्रीडा

'लग्नाचे आमिष दाखवून हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार...', स्टार खेळाडूवर बलात्काराचा गुन्हा दाखल

भारतीय हॉकी संघाच्या स्टार खेळाडूवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. या खेळाडूला 2018 मध्ये अर्जुन पुरस्कारही मिळाला होता.

अंकिता खाणे (Ankita Khane)

भारतीय हॉकी संघाच्या स्टार खेळाडूवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. या खेळाडूला 2018 मध्ये अर्जुन पुरस्कारही मिळाला होता. वरुण कुमारवर एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. वरुणवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आज (मंगळवारी) ही माहिती दिली आहे. वरुण ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य आहे.

पीडित तरुणी सध्या विमान कंपनीत कर्मचारी म्हणून काम करते. तरुणीने एफआयआरमध्ये दावा केला आहे की, ती 17 वर्षांची असताना 2018 मध्ये अर्जुन पुरस्कार विजेते वरुण कुमारच्या संपर्कात आली होती. यावेळी वरुण बेंगळुरू येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) मध्ये प्रशिक्षण घेत होता.

एफआयआरमध्ये तरुणीने आरोप केला आहे की, वरुण कुमारने तिच्याशी सोशल मिडीया इन्स्टाग्रामद्वारे संपर्क साधला आणि भेटण्याचा आग्रह केला. तो तिला भेटायला मागे लागला होता. वारंवार मेसेज करत होता पण, जेव्हा तिने प्रतिसाद दिला नाही तेव्हा त्याने त्याच्या मित्रांना भेटायला सांगितले. जेव्हा ती त्याला भेटली तेव्हा त्याने ती आपल्याला आवडत असल्याचे सांगितले, नंतर दोघे मित्र बनले आणि नातेसंबंधात आले.

त्यानंतर जुलै 2019 मध्ये वरुणने भविष्याबद्दल बोलण्याच्या बहाण्याने तिला जयनगर, बेंगळुरू येथील एका हॉटेलमध्ये बोलावले आणि त्यावेळी ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा पीडितेने विरोध केला तेव्हा त्याने त्यांचे नाते आणखी एक पाऊल पुढे नेण्याचे आणि नंतर तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले.

एफआयआरमध्ये तरुणीने म्हटले आहे की, लग्नाच्या बहाण्याने वरुणने पाच वर्षांच्या नात्यात तिच्याशी अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले. नंतर वरुणने पीडितेपासून दूर राहण्यास सुरुवात केली आणि तिच्या कॉल आणि मेसेजला प्रतिसाद देणे बंद केले.

फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

वरुणने पीडितेला धमकीही दिली होती. जर तिने त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणला तर तो तिचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करेल. एफआयआरनुसार, पीडितेने वरुणवर फसवणुकीचा आरोपही केला आहे. या प्रकरणी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले - तरुणीच्या तक्रारीच्या आधारे आम्ही सोमवारी हॉकीपटूविरुद्ध पॉक्सो कायदा आणि संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वरुण २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक संघाचा सदस्य

मूळचा हिमाचल प्रदेशचा असलेल्या वरुण कुमारने २०१७ मध्ये भारतासाठी पदार्पण केले. २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले तेव्हा हिमाचल प्रदेश सरकारने वरुणसाठी १ कोटी रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. 2022 च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही तो एक भाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT