India Hockey Team | Paris Olympic 2024 Sakal
क्रीडा

India Hockey Team: मेजर ध्यान चंद यांना त्रिवार अभिवादन! भारतीय हॉकीपटूच्या कृतीला सलाम

Paris Olympic 2024: भारतीय हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्यानंतर शनिवारी मायदेशी परतला. यानंतर त्यांनी मेजर ध्यान चंद यांना अभिवादन केले.

Pranali Kodre

India Hockey Team paid respects to Late Major Dhyan Chand: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत सहा पदके जिंकली आहेत. यामध्ये एक पदक भारतीय पुरुष हॉकी संघाने जिंकले आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वातील भारतीय संघाने कांस्य पदकाच्या लढतीत स्पेनला २-१ अशा फरकाने पराभूत केले.

यासह भारतीय पुरुष हॉकी संघाने त्यांचे विक्रमी १३ वे ऑलिम्पिक पदक जिंकले. याशिवाय भारतीय संघाने सलग ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा कारनामा ५२ वर्षांनंतर केला. याआधी भारताने २०२१ साली टोकियो ऑलिम्पिकमध्येही कांस्य पदक जिंकले होते. या विजयानंतर भारताचा हॉकी संघ मायदेशी परतला आहे.

भारतीय संघ शनिवारी सकाळी पॅरिसहून दिल्ली विमानतळावर उतरला. यावेळी त्यांचे ढोलांच्या गजरात जंगी स्वागत झाले. काही खेळाडूंनी यावेळी तालही धरला होता. त्यानंतर भारतीय संघ दिल्लीतील नॅशनल स्टेडियमवर गेला.

तिथे असलेल्या महान हॉकीपटू मेजर ध्यान चंद यांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. यावेळी खेळाडूंनी हॉकीचे जादूगार ध्यान चंद यांना फुलं वाहत त्यांना वंदन केलं. या क्षणांचे फोटोही हॉकी इंडियाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

भारतीय संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केलेल्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले, तर ग्रुप स्टेजमध्ये भारताने न्यूझीलंड, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या संघांना पराभूत केलं, तर अर्जेंटिनाविरुद्ध बरोबरी झाली होती. तसेच बेल्जियमविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता.

यानंतर उपांत्यपूर्व फेरीत भारताने ग्रेट ब्रिटनला १-१ अशा बरोबरीनंतर शूटआऊटमध्ये ४-२ अशा फरकाने पराभूत केले होते. मात्र उपांत्य फेरीत भारताला जर्मनीविरुद्ध २-३ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागल्याने सुवर्णपदकाच्या सामन्याला मुकावे लागले. मात्र कांस्य पदकाच्या सामन्यात भारताने स्पेनला पराभूत करत पोडियम फिनिश केली.

या संपूर्ण सामन्यात भारतीय संघाची सांघिक कामगिरी दिसून आली. त्यातही कर्णधार हरमनप्रीत सिंगची कामगिरी उल्लेखनीय राहिली. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक १० गोल केले. तसेच गोलकिपर पीआर श्रीजेशनेही चांगला बचाव केला.

पीआर श्रीजेशची निवृत्ती

३६ वर्षीय गोलकिपर पीआर श्रीजेशने पॅरिस ऑलिम्पिकनंतर आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने यापूर्वीच ही स्पर्धा त्याची अखेरची असेल असं सांगितलं होतं. त्यामुळे भारतीय संघाने हा विजय त्याला समर्पित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT