India Hockey Team | Paris Olympic 2024 Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024: भारतीय हॉकी संघ सेमीफायनल हरला, पण मेडलच्या आशा कायम; कधी होणार ब्राँझसाठीचा सामना?

India Hockey Team Bronze Medal Match: भारतीय हॉकी संघाचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं असलं, तरी अद्याप कांस्य पदक जिंकण्याचा आशा कायम आहेत. आता हा सामना कधी आणि कोणाविरुद्ध होणार आहे, जाणून घ्या.

Pranali Kodre

India vs Spain Bronze Medal Match Schedule: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत मंगळवारी भारत आणि जर्मनी या देशांच्या हॉकी संघांमध्ये उपांत्य फेरीचा सामना झाला. या सामन्यात जर्मनीच्या संघाने भारतीय संघावर ३-२ अशा गोल फरकाने विजय मिळवला.

त्यामुळे भारतीय संघाचं सुवर्ण किंवा रौप्य पदक जिंकण्याचं स्वप्न तुटलं. जर भारताने हा सामना जिंकला असता, तर त्यांनी अंतिम सामन्यातील प्रवेशासह पदकही पक्कं केलं असतं. पण असं असलं तरी अद्यापही भारताच्या पदकाच्या आशा संपलेल्या नाहीत. भारतीय संघ कांस्य पदकाच्या शर्यतीत कायम आहे.

कधी होणार कांस्य पदकाचा सामना?

भारताला आता सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे. भारतीय संघ कांस्य पदकाचा सामना स्पेनविरुद्ध ८ ऑगस्टला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५.३० वाजता खेळेल. स्पेनला नेदरलँड्सने उपांत्य फेरीत पराभूत केले आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक १२ पदके जिंकली आहेत, यात ८ सुवर्णपदकांचा समावेश आहे. आता जर भारताने गुरुवारी कांस्य पदक जिंकलं, तर ते ऑलिम्पिकमधील त्यांचं १३ वे पदक ठरेल. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्येही कांस्य पदक जिंकले होते.

भारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न तुटलं

दरम्यान, मंगळवारी भारतीय संघ पराभूत झाल्याने त्यांचं सुवर्णपदकाचं स्वप्न तुटलं आहे. या सामन्यात सातव्याच मिनिटाला कर्णधार हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला आघाडी मिळवून दिलेली.

परंतु, २३ व्या मिनिटाला गोन्झालो पिलेटने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत बरोबरी साधली, तर ख्रिस्तोफर रुहने २७ व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत जर्मनीला आघाडीवर नेले. यानंतर सुखजीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत बरोबरी साधली होती.

मात्र अखेरची ६ मिनिटे राहिलेली असताना मार्को मल्टकाऊने जर्मनीसाठी तिसरा गोल केला. अखेरच्या पाच मिनिटात भारताने बरोबरीसाठी अनेक प्रयत्न केले, मात्र जर्मनीने चांगला बचाव केला. त्यामुळे अखेरीस भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आता कांस्य पदकासाठी होणारा सामना भारताचा गोलकीपर पीआर श्रीजेशचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. या सामन्यानंतर तो निवृत्त होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT