India lost 1st test against New Zealand 
क्रीडा

INDvsNZ : सलग सात कसोटी जिंकणाऱ्या भारताचा न्यूझीलंडकडून धुव्वा

वृत्तसंस्था

वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड सर्वच आघाड्य़ांवर सर्वोत्तम कामगिरी करत भारताचा दारुण पराभव केला आहे. न्यूझीलंडने भारतावर दहा गडी राखून विजय मिळवला.  जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचा हा पहिला पराभव आहे. न्यूझीलंडने सर्वोत्तम कामगिरी करत भारताची सलग सात कसोटींमध्ये विजयाची घोडदौड रोखली आहे. 

चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरवात झाल्यावर भारताच्या चार बाद 144 धावा होत्या आणि न्यूझीलंडकडे 39 धावांची आघाडी होती. भारतीय संघ आता काय चमत्कार करतो हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते मात्र, टीम साउदीने भेदक गोलंदाजी करत भारताचा डाव 191 धावांमध्येच गुंडाळला. भारताकडे असलेली केवळ नऊ धावांची आघाडी किवींनी दहा चेंडूमध्येच पार केली आणि भारतावर दहा विकेट राखून दणदणीत विजय मिळवला.

पहिल्या डावात खराब कामगिरी केल्यानंतर दुसऱ्या डावात तरी भारतीय फलंदाज चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा चाहत्यांना होता मात्र, ती आशा केवळ 21 चेंडूच टिकली. चौथ्या दिवसाच्या तिसऱ्याच षटकात अजिंक्य रहाणे 29 धावांवर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ पुढच्याच षटकात हनुमा विहारी 15 धावांवर बाद झाला. रिषभ पंत आणि ईशांत शर्मा यांनी भारताला नावापुरती आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडने केवळ 79 मिनिटांमध्ये भारताला डाव गुंडाळला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हा 11वा पराभव आहे आणि या सगळ्या सामन्यांमध्ये त्याने नाणेफेक गमावली आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Bus: अतिरिक्त बस अन् पुढच्या दारातून प्रवेश, १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट प्रशासनाची मोठी घोषणा

Viral Video: मेट्रो स्टेशनवरच पार पडला साखरपुडा! प्रेमाची ही अनोखी स्टाइल पाहून सगळेच थक्क

Latest Marathi News Live Update : अमरावती महानगरपालिकेच्या ठरला महापौर

Bigg Boss Marathi 6 : आयुष की ओमकार; कुणावर आहे एलिमिनेशनची टांगती तलवार ? जाणून घ्या अखेरचे वोटिंग ट्रेंड्स

Explosion Firecracker Factory : गोजवाडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; परिसरात खळबळ, कोणतीही जीवितहानी नाही

SCROLL FOR NEXT