Men's Hockey World Cup 2023  esakal
क्रीडा

Hockey World Cup 2023 : वर्ल्डकप 2023 साठी भारतीय हॉकी संघाची घोषणा; हरमनप्रीत कर्णधार

अनिरुद्ध संकपाळ

Men's Hockey World Cup 2023 : ओडिसामध्ये होणाऱ्या पुरूष हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय हॉकी संघ येत्या 13 जानेवारीपासून आपली मोहीम सुरू करणार आहे. ग्रुप D मध्ये भारताबरोबरच इंग्लंड, स्पेन आणि वेल्स या संघाचा देखील समावेश आहे. दरम्यान, वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली. यात 18 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

भारतीय संघाचे नेतृत्व ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंह करणार आहे तर अमित रोहिदास हा संघाचा उपकर्णधार असेल. SAI सेंटर बंगळुरू येथील दोन दिवसीय निवड चाचणी शिबीरानंतर संघाची घोषणा करण्यात आली आहे. या चाचणीत 33 खेळाडूंना आजमावून पाहण्यात आले. यानंतर अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समतोल साधत 18 जणांचा अंतिम संघ निवडण्यात आला.

भारत 13 जानेवारीला राऊरकेलामध्ये स्पेनविरूद्ध खेळत आपली मोहीम सुरू करणार आहे. त्यानंतर भारतीय संघ आपला दुसरा सामना इंग्लंडविरूद्ध खेळेल. त्यानंतर भारतीय संघ वेल्सविरूद्धचा सामना खेळण्यासाठी भुवनेश्वरमध्ये पोहचेल. स्पर्धेची बाद फेरी 22 जानेवारी, क्रोसओव्हर सामने 23 जानेवारी, तर 25 जानेवारीला क्वार्टर फायनल सामने होतील. 27 जानेवारीला सेमी फायनल आणि 29 जानेवारीला फायनल होणार आहे. (Sports Latest News)

भारतीय पुरूष हॉकी संघ

गोलकिपर :

कृष्णा बहादूर पाठक

श्रीजेश परट्टू रविंद्रन

बचाव फळी :

जरमनप्रीत सिंग

सुरेंद्र कुमार

हरमनप्रीत सिंग (कर्णधार)

वरूण कुमार

अमित रोहिदास (उपकर्णधार)

नीलम संजीप

मधली फळी :

मनप्रीत सिंग

हार्दिक सिंह

नीलकांत शर्मा

शमशेर सिंह

विवेक सागर प्रसाद

हेही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nurse Strike: राज्यातील परिचारिकांचा संप, मागण्या मान्य न झाल्यास 'या' तारखेपासून राज्यव्यापी निषेधाची घोषणा, आरोग्य सेवा ठप्प होणार?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी अर्धा तास उशिराची मुभा; सरकारचा निर्णय, कारण काय?

अन् अर्जुनचा साक्षीला चेकमेट! कोर्टात दाखवला 'तो' पुरावा'; सगळेच शॉक, 'ठरलं तर मग'चा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

Eknath Shinde : राजकीय समीकरणे बदलणार? येवला तालुक्यात शिंदे गटाचे वर्चस्व वाढतेय

Government Scheme: मुलांच्या पालनपोषणासाठी मिळणार ४००० रुपये, मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू, अर्ज कसा करायचा?

SCROLL FOR NEXT