Neeraj Chopra | Paris Olympic 2024 Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024: Neeraj Chopra अव्वलच...पण फायनलमध्ये असणार 'या' ११ खेळाडूंचं आव्हान, पाकिस्तानी खेळाडूचाही समावेश

Javelin throw 12 finalist List: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत नीरज चोप्रासह पुरुषांच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीत पोहचणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घ्या.

Pranali Kodre

Neeraj Chopra Javelin Throw Final at Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतून मंगळवारी भारतीयांसाठी एक सुखद बातमी आली आहे. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुरुषांच्या भालाफेकीत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. त्यामुळे आता नीरज त्याचं सुवर्णपदक राखण्यासाठी अंतिम फेरीत भालाफेक करताना दिसेल.

मंगळवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीची पात्रता फेरी खेळवण्यात आली होती. या पात्रता फेरीत ३२ खेळाडूंचा समावेश होता. या ३२ खेळाडूंना १६-१६ च्या दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले होते.

या पात्रता फेरीत ८४ मीटरच्या पुढे भालाफेक करणाऱ्या सर्व खेळाडूंना किंवा दोन्ही ग्रुपमध्ये मिळून सर्वोत्तम भालाफेक करणाऱ्या १२ खेळाडूंना अंतिम फेरीत स्थान देण्यात येणार होते.

त्यानुसार ए आणि बी ग्रुपमधून एकूण ९ खेळाडूंनी ८४ मीटरच्या पुढे भाला फेकला. त्यामुळे या ९ खेळाडूंव्यतिरिक्त इतर ३ जणांना ज्यांनी सर्वोत्तम भालाफेकीचे अंतर कापले आहे, त्यांना अंतिम फेरीत स्थान देण्यात आले. त्यामुळे आता ८ ऑगस्टला होणाऱ्या अंतिम फेरीत १२ खेळाडू पदकांसाठी भालाफेक करताना दिसणार आहेत.

पात्रता फेरीत नीरजच अव्वल

नीरज या पात्रता फेरीत बी ग्रुपमध्ये होता. त्याने या ग्रुपमध्ये पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर लांब भाला फेकला. यासह त्याने अंतिम फेरीतील स्थानही पक्के केले. विशेष म्हणजे त्याचे हे अंतर दोन्ही ग्रुपमधील अन्य सर्व स्पर्धकांनी पार केलेल्या अंतरापेक्षा अधिक होते. त्यामुळे तो दोन्ही ग्रुपमधूनही अव्वल क्रमांकावर राहिला.

मात्र नीरजबरोबर या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या किशोर जेनाकडून निराशा झाली. किशोर जेना ए ग्रुपमध्ये होता. त्याने अंतिम फेरीत पहिल्या प्रयत्नात ८०.७३ मीटर लांब भाला फेकला. हे त्याचे सर्वोत्तम अंतरही ठरले.

कारण त्याचा दुसरा प्रयत्न अपयशी ठरला, तर तिसऱ्या प्रयत्नात त्याला ८०.२१ मीटरच अंतर पार करता आले. तो ए ग्रुपमध्ये ९ व्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे त्याला अंतिम फेरी गाठता आली नाही.

दरम्यान, अंतिम फेरीत नीरजबरोबरच झेक प्रजासत्ताकच्या याकुब वाडलेच, जर्मनीचा ज्युलियन वेबर, पाकिस्तानचा अर्शद नदीम, ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स यांच्यावरही सर्वांचे लक्ष असणार आहे.

अंतिम फेरीत स्थान मिळवणारे १२ खेळाडू

  • १. नीरज चोप्रा - भारत (८९.३४ मीटर, ग्रुप बी)

  • २. अँडरसन पीटर्स - ग्रेनेडा (८८.६३ मीटर, ग्रुप बी)

  • ३. ज्युलियन वेबर - जर्मनी (८७.७६ मीटर, ग्रुप ए)

  • ४. अर्शद नदीम - पाकिस्तान (८६.५९ मीटर, ग्रुप बी)

  • ५. जुलियस येगो - केनिया (८५.९७ मीटर, ग्रुप ए)

  • ६.लुइझ मौरिसिओ डा सिल्वा - ब्राझील (८५.९१ मीटर, ग्रुप बी)

  • ७. याकुब वाल्डेच - झेक प्रजासत्ताक (८५.६३ मीटर, ग्रुप ए)

  • ८. टोनी केरानेन - फिनलँड (८५.२७ मीटर, ग्रुप ए)

  • ९. अँड्रियन मर्डेअर - मोलदोवा (८४.१३ मीटर, ग्रुप बी)

  • १०. ऑलिव्हर हेलँडर - फिनलँड (८३.८१ मीटर, ग्रुप ए)

  • ११. केशॉर्न वॉलकॉट - त्रिनिगाद अँड टेबॅगो (८३.०२ मीटर, ग्रुप ए)

  • १२. लस्सी इटेलॅटलस - फिनलँड (८२.९१ मीटर, ग्रुप बी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT