krida  sakal
क्रीडा

T20 World Cup : भारत-पाकिस्तानचा महामुकाबला

यजमान असलेला भारत पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यातून विश्वकरंडक स्पर्धेची मोहीम सुरू करणार आहे

सकाल वृत्तसेवा

दुबई : अवघ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष लागलेला भारत-पाकिस्तान महामुकाबला उद्या (ता. २४) दुबईच्या स्टेडियमवर होत आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धचे सर्व सामने जिंकणारा भारत ही परंपरा कायम राखण्यासाठी लढणार आहे; तर सातत्याने पराभवाचे तोंड पाहावे लागलेला पाकिस्तान नवी सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या दोन्ही विश्वकरंडक स्पर्धांत मिळून भारताने पाकिस्तानवर १२-० (यातील एक सामना टाय, पण तोही भारताने बॉलआउटमध्ये जिंकलेला) अशी मक्तेदारी गाजवलेली आहे.

यजमान असलेला भारत पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यातून विश्वकरंडक स्पर्धेची मोहीम सुरू करणार आहे. त्यामुळे सर्वार्थाने हा सामना महत्त्वाचा आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव आणि सराव सामन्यातील शानदार कामगिरी ही मोठी ताकद भारतीयांकडे आहे; तर पाकिस्तानचा एका सराव सामन्यात पराभव झालेला आहे.एकूणच भारताचे पारडे जड असले तरी सावध राहावे लागणार आहे. भारतीयांसाठी पाकिस्तानच्या काही खेळाडूंचा अपवाद वगळता इतर खेळाडू नवखे आहेत, त्यामुळे ‘नजर हटी दुर्घटना घटी’ हे टाळण्यासाठी भारतीयांना दक्ष राहावे लागणार आहे.

थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस्

वेळ - आज सायंकाळी- ७.३० पासून

भारत-पाकिस्तान आमने-सामने

ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत एकूण पाच लढती

पाचही लढतीत भारताचा विजय

एक लढत टाय होती, पण बॉलऑउटमध्ये भारताचा विजय

दोन्ही संघांत ट्वेन्टी-२० चे एकूण आठ सामने, त्यात सात लढतीत भारताचा विजय

सातपैकी तीन सामन्यांत प्रथम फलंदाजी करताना आणि चार सामन्यांत धावांचा पाठलाग करताना भारताचा विजय

पाकिस्तानचा एकमेव विजय बंगळूरमध्ये २०१२ मधील सामन्यात झाला होता

दुबईच्या स्टेडियमवर प्रथमच एकमेकांविरुद्ध खेळणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी, पण भारताला २०० धावांच्या आत रोखण्यात झिम्बाब्वेला यश; श्रेयस अय्यरची टीम व्हाईटवॉश देणार?

Tata Products: महागाईचा आणखी एक झटका! टाटा चहा, मीठ, डाळींचे दर वाढवणार; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार

Viral Video : अंतराळातून दिसला भारताचा थक्क करणारा नजारा; वादळी ढग अन् विजांचा कडकडाट, ISS चा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Update : AIMIMच्या नगरसेवकावर प्राणघातक हल्ला; चंद्रपूरमध्ये खळबळ

IND vs ZIM 3rd T20I: वैभव सूर्यवंशीचं शतक थोडक्यात हुकलं, पण विश्वविक्रम रचला! क्रिकेट इतिहासात असा पराक्रम करणारा पहिलाच ठरला

SCROLL FOR NEXT