India Playing XI 1st Test sakal
क्रीडा

IND vs BAN : टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये मोठा बदल! 3 स्पिनर्ससह का उतरली मैदानात ?

Kiran Mahanavar

India vs Bangladesh Test Series Playing XI : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चितगाव येथे खेळल्या जात आहे. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातूनही ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. टीम इंडियाला दोन्ही सामने जिंकून अंतिम फेरी गाठण्याची आशा जिवंत ठेवायची आहे.

भारतीय संघाचा कार्यवाहक कर्णधार KL राहुलने पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादवसह 3 फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे, बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जयदेव उनाडकटला तब्बल 12 वर्षांनंतर भारतीय संघात संधी मिळाली. पण व्हिसा मिळण्यास उशीर झाल्यामुळे तो आतापर्यंत बांगलादेशला पोहोचू शकला नाही, त्यामुळे तो पहिल्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. उनाडकटच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची जबाबदारी मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांच्या खांद्यावर असेल.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी भारताला एकूण 6 कसोटी सामने खेळायचे आहेत. टीम इंडियाला यापैकी किमान 5 कसोटी सामने जिंकावे लागतील. दुसरीकडे यजमान बांगलादेश संघ एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आत्मविश्वासाने भरलेला आहे. मात्र कसोटी मालिकेत शाकिब अल हसन त्याच्याकडून संघाची धुरा सांभाळणार आहे.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून कुलदीप यादवचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. विशेष म्हणजे आज कुलदीप यादवचाही वाढदिवस आहे. कुलदीपशिवाय संघात अश्विन आणि अक्षर पटेल हे आणखी दोन फिरकी गोलंदाज आहेत.

  • भारताची प्लेइंग इलेव्हन : शुभमन गिल, केएल राहुल (क), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमेश यादव

  • बांगलादेश प्लेइंग इलेव्हन : झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, शकीब अल हसन (क), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), यासिर अली, नुरुल हसन, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, खालिद अहमद आणि इबादत हुसेन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT